वळण मध्ये पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवाराचा सत्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण मध्ये पराभूत उमेदवाराकडून विजयी उमेदवाराचा सत्कार

 वळण/गोविंद फुणगे           राहुरी तालुक्यातील वळणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एका पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवारांचा सत्...

 वळण/गोविंद फुणगे 

         राहुरी तालुक्यातील वळणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एका पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्याने खिळाडू वृत्तीचे दर्शन झाले असून निवडणूक संपली आणि विरोध संपला याचे उत्तम दर्शन वळणमधे घडले आहे.

        राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीचा निवडणुक निकाल लागला असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधुन परिवर्तन मंडळाचे उमेद्वार धनंजय विक्रम आढाव यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला असून त्यांनी पराभवाचे शल्य मनात न ठेवता परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष विजय मकासरे,ॠषी आढाव,विजय आढाव,बाळासाहेब आढाव,खंडु आढाव  यांच्यासह जनसेवा मंडळाचे विजयी उमेद्वार एकनाथ ज्ञानदेव खुळे  यांचा निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्याने त्यांच्या खिलाडू वृत्तीचा जनतेतुन स्वागत केल जात आहे. 


धनंजय आढाव यांनी प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक लढवली असून ऐनवेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत मोठ्या शर्तीने प्रयत्न केले शर्तीचे प्रयत्न करूनही अगदी थोड्याफार मताने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले माञ पराभवाचे शल्य मनात न ठेवता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून विजयी उमेद्वारांचा सत्कार केल्याने आढाव यांच्या खिलाडु वृत्तीचे कौतुक केल जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत