कोपरगाव शहर प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या सार्वत्रिक निकालात सत्ताधारी आ आशुतोष काळे गटाला जोरदार धक्का बसला अ...
कोपरगाव शहर प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या सार्वत्रिक निकालात सत्ताधारी आ आशुतोष काळे गटाला जोरदार धक्का बसला असून भाजपच्या माजी आ सौ स्नेहलता कोल्हे गटाला २२ ग्रामपंचायतीवर बहुमत मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या काळे गटाला फ़क्त ८ ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे तर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या संवत्सर ग्रामपंचातीवर जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांना आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले आहे.
*कोल्हे गट* जेऊर कुंभारी ९ पैकी ७ जागा, सोनारी ७ पैकी ४ जागा, वेळापूर १० पैकी ६ जागा, ओगदी ७ पैकी ४ जागा, आंचलगाव ७ पैकी ६ जागा, नाटेगाव ९ पैकी ७ जागा, उक्कडगाव ९ पैकी ५ जागा, मनेगाव ७ पैकी ५ जागा, माळेगाव थडी ९ पैकी ८ जागा, अंजनापूर ७ पैकी ४ जागा, रवंदे १३ पैकी १० जागा, देर्डे चांदवड ९ पैकी ७, धोंडेवाडी ८ पैकी ५ जागा, जेऊर पाटोदा ११ पैकी ६ जागा, येसगाव ११ पैकी ९ जागा, टाकळी १३ पैकी ८ जागा, काकडी ११ पैकी ८ जागा, अपेगाव ९ पैकी ८ जागा, कासली ९ पैकी ५ जागा,घारी ९ पैकी ५ जागा, रामपुरवाडी ११ पैकी ६ जागा तर शिंगवे ११ पैकी ८ जागा मिळवत कोल्हे गटाने २२ ग्रामपंचायतीवर आपला विजयाचा झेंडा रोवला आहे.
*काळे गट* कोळगाव थडी ९ पैकी ७ जागा, मायगाव देवी ९ पैकी ९ जागा, मढी बु ९ पैकी ६ जागा, मढी खु ९ पैकी ५ जागा, हिंगणी ७ पैकी ५ जागा, कोकमठाण (काळे शिवसेना युती) १७ पैकी १५ जागा, तीळवणी ७ पैकी ७ जागा तर जळगाव एलमवाडी ११ पैकी ८ जागा मिळवत काळे गटाने तालुक्यात ८ ग्रामपंचायत वर आपला विजय मिळवला आहे.
*परजणे गट* संवत्सर १७ पैकी १४ जागा वर विजय मिळवत बहुमताने सत्ता ताब्यात राखली आहे.
*बिनविरोध* सांगवी भुसार गावची ग्रामपंचायत राजेंद्र जाधव व राजेश परजणे यांच्या प्रयत्नाने ९ पैकी ६ जागा बिनविरोध करत स्वतःकडे राखल्या तर ३ जगाचे प्रत्यक्ष मतदान होऊन त्यात २ जागा कोल्हे गटाने तर १ जागा काळे गटाने जिंकली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत