राहूरी फॅक्टरी(वेबटीम) ऑनलाईन अभ्यास करत नाही म्हणून पालकाच्या हातात संस्था चालकांनी दाखला दिला होता.त्या मुलीचा शिक्षणाचा मार्ग पुन्हा खु...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
ऑनलाईन अभ्यास करत नाही म्हणून पालकाच्या हातात संस्था चालकांनी दाखला दिला होता.त्या मुलीचा शिक्षणाचा मार्ग पुन्हा खुला झाला असून न्यू इंग्लिश स्कूल शाळेने दोन पावले मागे येतात झाल्या प्रकारावर पडदा टाकला आहे त्याच बरोबर इयत्ता केजी ते चौथी पर्यंतची पहिल्या सत्रातील फी तीन हजार रुपये कमी करून पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
याबाबत 'आवाज जनतेचा' पोर्टलवर सविस्तर वृत्तांकन करण्यात आले होते ऑनलाईन अभ्यास करत नाही हे कारण शाळेने दिले होते तर पालकाने फी भरली नाही म्हणून शाळेत दाखला दिला अशी भूमिका पालकाने मांडली होती दरम्यान नगरसेवक आदिनाथ कराळे यांनीदेखील संबंधित पालकांची बाजू घेऊन आपल्या मुलांचे दाखले शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण खात्याकडून अर्जुन गारुडकर या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यान चौकशी पूर्ण होण्या अगोदरच संस्थेचे सचिव प्राध्यापक सतीश राऊत ,नानासाहेब कदम, नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, पत्रकार अशोक काळे, राजेंद्र उंडे, श्रीकांत जाधव ,ऋषी राऊत व संबंधित मुलीचे पालक व नातेवाईक यांची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत शाळेच्या वतीने प्राध्यापक सतीश राऊत यांनी वरील भूमिका मांडली. शाळेमध्ये सुसंवाद कक्ष स्थापन करण्याचे सांगितले त्याचबरोबर गैरसमजुतीतून असे प्रकार घडत असतात असे स्पष्ट करून त्या विद्यार्थिनीला पुन्हा शाळेत हजर करून घेण्याचे सांगितले.
दरम्यान 'आवाज जनतेचा' पोर्टल वरून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. याबैठकीतील निर्णय सोशल मिडीयावर जाहिर करण्यात आल्या नंतर या बैठकीशी व दाखला प्रकरण आंदोलनात कुठलाही संबंध नसताना काही जणांनी आकलेचे तारे तोडले एका स्वयंघोषित "वामन" अवताराने आपल्यामुळेच शाळेची फी संस्थेने कमी केली असल्याचा दावा केला. व आणखी काही प्रश्न असल्यास तातडीने सोडविल अशी फुशारकी मारली. या प्रकरणाचा तिढा मिटवण्यासाठी त्यांना कोणत्याही पत्रकाराने प्रश्न विचारले नाहीत.उलट पञकारांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या कश्या चुकीच्या आहेत हेच ते सांगत होते.संस्था चालकासमोर माझी कशी समृद्ध आहे. हे दाखविण्यासाठी त्यांच्या बेसुमार मर्कट लीला सर्वांनी पहिल्या.या धडपडी साठी त्यांनी संस्था चालकाकडून दोन प्रवेश विनामुल्य घेतले असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती.श्रेयवाद घेणारे या संपूर्ण प्रकरणात अदखलपात्र आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत