कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यात निवडणूक जवळ आली की राजकीय नेते व पक्ष सहमती एक्सप्रेसची शिट्टी वाजवू लागतात मात्र या सहमती एक्सप्रेस शह...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यात निवडणूक जवळ आली की राजकीय नेते व पक्ष सहमती एक्सप्रेसची शिट्टी वाजवू लागतात मात्र या सहमती एक्सप्रेस शहर विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी असतात असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, निवडणूक जवळ आली की कोपरगावच्या नेत्यांना शहर विकासाच्या आडून सत्तेची स्वप्न पडू लागतात आणि त्या साठी हे सहमती एक्सप्रेस नावाच्या गाडीत बसून जनतेला कानठळ्या बसतील अशा शिट्ट्या वाजवत असतात.
साखर कारखाना,दूध संघ या निवडणुकीत ही सहमती एक्सप्रेस हमखास धावत असते त्याच प्रमाणे यापूर्वी कोपरगाव नगरपालिकेत काळे कोल्हे यांची सहमती एक्सप्रेस धावली होती.
त्या वेळी या सहमती एक्सप्रेसने कोट्यवधी रुपयांची पाणी योजना शहरवासीयांना पाणी देण्यासाठी राबवली मात्र निवडणुकी नंतर ही सहमती एक्सप्रेस रुळावरून घसरली त्याच प्रमाणे एक वर्षांपूर्वी विधान सभा निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लुटुपुटीची निवडणूक लढवलेले विद्यमान आमदार काळे व लोकप्रिय नगराध्यक्ष वहाडणे हे सध्या सहमती एक्सप्रेस मध्ये सफर करत असून कोपरगाव शहरातील नागरिकांना शहर विकासा करिता पाच नंबर तळे,रस्ते खोका शॉप,व्यापारी संकुल आदी स्वप्न दाखवत आहेत मात्र निवडणुकी पूर्वी सुरू झालेली ही सहमती एक्सप्रेस खरोखर शहर विकास करण्यासाठी आहे की स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आहे असा कोपरगाव कर नागरिकांना प्रश्न पडला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत