कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. कोपरगाव शहरात भूमिपूजनाचे फलक कोणीतरी अज्ञ...
कोपरगाव(वेबटीम)
ते पुढे असे हि म्हणाले कि, सत्तेवर असलेल्या पक्षाने काहीहि झाले तरी त्याचे खापर विरोधी पक्षावर फोडायचे हि परंपरा सत्ताधारी पक्ष कायम करताना दिसत आहे.निवडणुका जवळ आल्या कि आरोप, प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात होते.कोपरगाव शहरात भूमिपूजनाचे फलक कोणीतरी अज्ञातांनी फाडले अशा दूषप्रवृत्तीच्या लोकांचा व झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.
पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील कोणताच नेता कार्यकर्त्यास असे दुष्कृत्य करायला सांगत नाही मग कार्यकर्ते आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी व लक्ष वेधुन घेण्यासाठी खालच्या स्तरावर जाता आहे ही मोठी शोकांतीका आहे.
आजही मी दोन्ही नेत्यांचा आदर करतो.नेता असो वा कार्यकर्ता हे दोघेही समाज कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात म्हणून कुणालाच ऐकेरी भाषेत बोलू नये ही आदरणीय कोल्हे परिवाराची शिकवण आहे.त्यांच्या सहवासात असणाऱ्या मोठ्या असो किंवा छोट्या कार्यकर्त्यास प्रामाणिक आणि सर्वांचा आदर करण्याची शिकवण कोल्हे परिवाराची आहे.या परिवाराने आज पर्यंत समाजाचा आणि तालुक्याचा विकास निस्वार्थी पणाने केला आणि पुढेही असेच करत राहणारा आहे.हे जनतेला सुद्धा माहित आहे. आणि आज जे कार्यकर्ते कोल्हे परिवारावर आरोप करता आहे त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे करण त्यांनी सुद्धा या पूर्वी या परिवारा सोबत समाज कार्याची कामे केली आहे.माझी सत्ताधारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की राजकारण जरूर करा पण खालच्या स्तरावर जाऊन शहरातील शांतता भंग होईल आणि हानी व नुकसान होईल असे कृत्य करू नका.
कोपरगाव शहरात आणि तालुक्यात विविध प्रश्न आहे ते मार्गी कसे लागेल,पक्षामार्फत समाज कल्याणासाठी काय करता येईल,नागरिकांचे प्रलंबित प्रश्न कसे सोडविता येईल यावर उपाय आपल्या नेत्याला सुचवा नाकी असे घाणरडे राजकारण करून आपल्या नेत्याची अब्रू चव्हाट्यावर आणू नका.
राजकारण करा जरूर करा पण आणि अशी स्टंट बाजी करू जनतेचे लक्ष विचलित करून आपल्या नाकर्तेपणाचे खापर विरोधी पक्षावर फोडू नका असे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत