शिर्डी पोलीसांच्या कामगिरीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान टळले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिर्डी पोलीसांच्या कामगिरीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान टळले

  कोपरगाव(अक्षय काळे) शिर्डी येथील लक्ष्मीनगर भागातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीनी पूजा सुभाष कोतकर हिने किर्गीझस्थान मधील ISM युनिव्हर...

 कोपरगाव(अक्षय काळे)

शिर्डी येथील लक्ष्मीनगर भागातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीनी पूजा सुभाष कोतकर हिने किर्गीझस्थान मधील ISM युनिव्हर्सिटी बिस्केक येथे MBBS च्या पदवी सन- २०१८मध्ये कोटकासीम जि.अलवर, राजस्थान येथील दलाल नाव सुनिलकुमार रामानंद यादव याचे मार्फत सन -२०१८ मध्ये प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेतलेला होता. सदर पदवीसाठी फिर्यादीचे वडील नाव सुभाष श्यामराव कोतकर यांनी सुनीलकुमार यादव दलाल याच्या अकाँउटवर एमबीबीएसच्या पदवी प्रवेशासाठी लागणारी फी म्हणून ५,००,०००/-रु. आँनलाईन भरणा केलेले होते. परंतु दलाल सुनीलकुमार यादव याने सदरची फी म्हणून घेतलेली रक्कम ही सदरयुनिव्हर्सिटी मध्ये भरण्यास टाळाटाळ केली व सदर रकमेचा स्वताचे फायद्यासाठी अपहार केला. 

सदर मुलीचे पालकांची सर्वसाधारण परिस्थिती असून  आर्थिक अडचण सोसून त्यांनी त्यांचे मुलीला उच्च शिक्षण देवून डॉक्टर बनविण्याचा ध्यास घेतला परंतु दलालाने फसवणूक केल्याने मुलीच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला व पुढील शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली होती.

परंतु सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदर मुलीच्या पुढील आयुष्याचे होणारे नुकसान टळावे या उदात्त भावनेने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील  अहमदनगर व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर डॉ. दिपाली काळे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री. संजय सातव यांचे सुचनांप्रमाणे

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी सपोनि  प्रविण दातरे, पोकॉ/ गोकुळ पळसे, पोको रिझवान शेख यांचे पथक कोटकासीम जि.अलवर, राजस्थान येथे रवाना करून सदर पथकाने नमूद दलालाचा तांत्रिक पद्धतीने शोध घेवून त्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने योग्य ती चौकशी केली असता यातील आरोपी दलाल सुनिल यादव याने फिर्यादी यांचे वडील यांचेशी संपर्क साधून सदर गुन्ह्यातील फसवणूक रक्कम रोख स्वरुपात परत देण्याची तयारी दर्शविल्याने फिर्यादी व आरोपी यांचेत समझोता होवून फिर्यादी यांना त्यांची ५,००,००० रुपये रक्कम पूर्णपणे परत मिळाल्याने फिर्यादी यांचे मोठे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

सदर घटने विषयी अधिक माहिती सांगताय उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव सदरची कामगिरी श्री.मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर डॉ. दिपाली काळे  व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी,  श्री. संजय सातव  यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोनि श्री. प्रविण लोखंडे, शिर्डी पोलीस स्टेशन, सपोनि श्री. दिपक गंधाले,सपोनि श्री.मिथुन घुगे, सपोनि श्री. प्रविण दातरे व पोसई जाणे यांनी व त्यांच्या पथकातील कर्मचारी पोकॉ गोकुळ पळसे, पोकॉ रिझवान शेख, पोकॉ फिरोज पटेल, पोकॉ नितीन शेलार यांनी तसेच सायबर सेल श्रीरामपुर येथील पोना फुरकान शेख, पोकॉ प्रमोद जाधव, पोकॉ आकाश भैरट यांनी केलेली आहे.

योग्य वेळी विद्यार्थीनीची फी ची रक्कम परत मिळाल्याने विद्यार्थीनींने शिर्डी पोलिसांचे आभार मानले असुन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व तपास पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी यांचा सत्कार केला आहे. पोलिसांनी विद्यार्थीनीला फी रक्कम परत मिळुन दिल्याने पुढील शिक्षणासाठीचा प्रश्न आता सुटला आहे. सदर विद्यार्थीनींने फी परत मिळुन दिल्याने शिर्डी पोलिसांने आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत