कोपरगाव येथे कोरोना योद्यांचा सन्मान संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे कोरोना योद्यांचा सन्मान संपन्न

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना सेवा पुरविणाऱ्या कोरोना योद्धांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्त...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना सेवा पुरविणाऱ्या कोरोना योद्धांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 कोपरगाव येथील एसएसजीएम कॉलेज कोव्हीड सेंटर येथील रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून दररोज मोफत चहाचे वाटप येवला नाका येथील दीनानाथ टी.हाऊसचे मालक संभाजी जाधव वगणेश जाधव करत असल्याने त्यांचा व नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्ण सेवा करीत असलेले कोपरगाव तालुक्यातील  टाकळी येथील बाबासाहेब देवकर यांनी कोरोनाच्या काळातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

 यावेळी माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील ,हिंदूवाडा तरुण मंडळाचे संस्थापक शबाळासाहेब रुईकर ,माजी नगरसेवक कृष्णा आढाव समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संतोष ( बापू ) वढणे , कोपरगाव तालुका उपाध्यक्ष संदीप अनर्थे ,समताचे शहर उपाध्यक्ष किरण थोरात ,तालुका सहसचिव मयूर बोरावके आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत