राहुरी खुर्द येथे गॅस टाकीचा स्फोट , जिवितहानी टळली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी खुर्द येथे गॅस टाकीचा स्फोट , जिवितहानी टळली

  देवळाली प्रवरा (राजेंद्र उंडे)        भल्या पहाटे पाटील श्रीदत्ताची पुजा करण्यासाठी बाहेर पडले.पुजा सुरु असतानाच स्फोट झाला.पाटील यांनी स्...

 देवळाली प्रवरा (राजेंद्र उंडे)

       भल्या पहाटे पाटील श्रीदत्ताची पुजा करण्यासाठी बाहेर पडले.पुजा सुरु असतानाच स्फोट झाला.पाटील यांनी स्फोटाच्या दिशेने धाव घेतली असता आपल्याच घरात अग्नितांडव घडले आहे. याहि परीस्थितीत त्यांचे डोळे कुटुंबातील सदस्यांचा शोध घेवू लागले. कुटुंबातील सदस्यांना सुखरुप असल्याचे पाहुन पाटील यांच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा सुरु झाल्या.श्रीदत्ताची कृपेमुळेच माझे कुटुंब वाचले आहे.

         राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमध्ये एका घरात शनिवारी (ता. २) पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला.घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. परंतु, पसरलेल्या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपयाच्या वस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली. 

         अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव घडले. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. घरासमोरील श्री दत्त मंदिरात दैनंदिन पूजेसाठी पहाटे सव्वाचार वाजता पाटील घराबाहेर पडले. त्यांच्या पत्नी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. घरात दोन मुलगे, एक भाचा, एक भाची झोपलेले होते.  एका खोलीत सिलबंद भरलेले गॅस सिलेंडर ठेवले होते. तेथे अचानक अग्नितांडव सुरू झाले. घरातील सर्वजण तत्काळ बाहेर धावले. गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला.

         श्रीदत्तमंदिरात गेलेले पाटील यांनी स्फोटाचा आवाज ऐकून, घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चारही खोल्यांमध्ये आग पसरली. घरातील अंथरून- पांघरून, कपडे, स्टीलची दोन कपाटे, एक फ्रीज, अन्नधान्य, किराणा सामान, घरगुती वापरण्याच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केले. सिलेंडरचा स्फोटाने घराचे दरवाजे, खिडक्या, तावदाने फुटली. सहा महिन्यापूर्वी नवीन घेतलेली एक दुचाकी आगीत भस्मसात झाली.

     शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनी घरातील साठवण टाकीतील पाणी बादल्यांनी फेकून, आग विझवण्याचा प्रयत्न केला. महावितरण कंपनीने तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आली.

शॉर्टसर्किटची शक्यता..!

श्रीदत्त वसाहत कृषी विद्यापीठाने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली आहे. त्यावेळचे घरातील वायरिंग जीर्ण व खराब झालेले आहेत. गॅसचे सिलेंडर ठेवलेल्या खोलीत वीजेच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन, अग्नितांडव सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत