खा.डॉ.सुजय विखे पाटील राजीनामा देणार? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खा.डॉ.सुजय विखे पाटील राजीनामा देणार?

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील ७२ तासात डॉ.तनपुरे कारखाना सुरळित न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्या...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील ७२ तासात डॉ.तनपुरे कारखाना सुरळित न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खा.सुजय विखे पाटील यांनी दिला.

डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली प्रसंगी डॉ.विखे बोलत होते.

पुढे बोलताना डॉ.सुजय विखे म्हणाले की, कोट्यावधी  रुपये खर्च करूनही डॉ.तनपुरे साखर कारखाना  सुरळीत  चालत नाही. नैसर्गिक दोष असता तर तो मान्य केला असता परंतू बॉयलरमध्ये जेव्हा साखर दिसून आली त्यावेळेस मी सुन्न झालो. हा केवळ मानवनिर्मित हलगर्जीपणा असून अशा प्रकारे बॉयलरमध्ये साखर येऊ शकत नाही. हा कारखाना सुरळीत चालावा असा आमचा आणि सर्व संचालक मंडळाचा प्रामाणिकपणे  प्रयत्न होता आणि अजूनही आहे. मात्र हा कारखाना सुरळित चालू नये अशी काही लोकांची मानसिकता असल्याने अशा प्रकारे मानवनिर्मित दोष कारखान्यात आढळून आले आहे. 

शेतकरी  व सभासद यांचे नुकसान होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना असून पुढील ७२ तासात नैसर्गिक आपत्ती वगळता डॉ.तनपुरे कारखाना सुरळीत चालू झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खा.डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. यावेळी चेअरमन नामदेव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


डाँ.सुजय विखेंना खासदार साहेबांची आठवण आली असेल ?

         राहुरीचे राजकारण फार वेगळे आहे. हे खुद्द सुजय विखे यांना डाँ.तनपुरे कारखाना निवडणूकीतील प्रचारा दरम्यान कै.खा.बाळासाहेब विखे यांनी सांगितले होते. राहुरीची मंडळी जिरवा जिरवीचे राजकारण करतात  त्यामुळे कै.खा.विखे यांचा राहुरीतील राजकारणाला विरोध होता. विरोध झुगारुन खा.सुजय विखे यांनी डाँ.तनपुरे कारखाना निवडणूक लढवली व जिंकली गेली साडेचार वर्ष कारखाना सुरळीत चालवला  परंतु पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक आल्याने खा.डाँ.विखे यांच्यासह संचालक मंडळास बदनाम करण्यासाठी कारखान्यात मानवनिर्मित संकट तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे खा.डाँ.विखे यांना कै.खा.विखे यांची आठवण आली असेल त्यावरुनच राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा असा अनेकजण अंदाज व्यक्त करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत