राहुरी(वेबटीम) जिल्ह्यात मानाचा समजला जाणारा ‘छत्रपती’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता उंबरे येथे संपन्न ह...
राहुरी(वेबटीम)
जिल्ह्यात मानाचा समजला जाणारा ‘छत्रपती’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता उंबरे येथे संपन्न होणार आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते व निवृत्ती महाराज इंदोरीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष प्रा. जालिंदर दुशिंग, अध्यक्ष प्रा. रामकृष्ण ढोकणे व उपाध्यक्षा विद्या करपे यांनी दिली.
छत्रपती प्रतिष्ठाण दरवर्षी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या व्यक्तींचा ‘छत्रपती’ पुरस्काराने सन्मान करत असते. यावर्षी शनिवारी दुपारी संपन्न होणार्या या कार्यक्रमासाठी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार निलेश लंके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेशराव वाबळे, चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, साई आदर्शचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी संपादकीय- मिलींद बेंडाळे ( पुढारी), मल्टीस्टेट चळवळीतील कामगिरीबद्दल प्रशांत भालेराव (रेणुका माता मल्टिस्टेट, नगर), महिला सबलीकरण-स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), आदर्श नगराध्यक्षा- अनुराधा आदिक (श्रीरामपूर), राजकीय युवा ऑयडॉल- सत्यजित कदम (देवळाली), आदर्श सरपंच- दिपालीताई वाघ (चितळी), प्रशासकीय- फसयोद्दीन शेख ( तहसीलदार,राहुरी), पोलिस प्रशासन- उपनिरीक्षक गणेश शेळके महावितरण विभाग- धीरजकुमार गायकवाड (राहुरी), क्रीडा- लॉरेन्स बलराज (श्रीरामपूर), आदर्श शिक्षक- दत्तात्रय म्हसे ( टाकळीमिया), धार्मिक- ह.भ.प. कोळी काकी, कृषि- नितीन शेलार (श्रीगोंदा), सोशल मिडीया- योगेश बानकर (ब्राम्हणी), वैद्यकीय- डॉ. राधा गमे ( राहाता), सांस्कृतिक- हरिभाऊ गवळी (नेवासा), सामाजिक- रमेश गवळी ( कोपरगाव), आदर्श पोलिस पाटील- गोरक्षनाथ देव्हारे (उंबरे), कोरोना योद्धा- योगेश तांबे (सिव्हील, नगर), युवा संघटन- अशोकराव तुपे ( वांबोरी), इलेक्ट्रॉनिक मिडीया ः मनोज गाडेकर (टीव्ही 9शिर्डी), पत्रकारीता- प्रभाकर मकासरे( पुण्यनगरी) आदींचा छत्रपती पुरस्कार देवून गौरव होणार आहे.
तरी, कार्यक्रमानंतर इंदोरीकर महाराजांचे कीर्तन होणार असून या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक आदिनाथ महाराज दुशिंग, विलासराव ढोकणे, भाऊसाहेब ढोकणे, राजेंद्र ढोकणे, लक्ष्मण पटारे, शरद ढोकणे, दीपक पंडीत, शरद वाघ, गणेश ढोकणे, गणेश दुशिंग, भाऊराव कवडे, गोरक ढोकणे, गणेश भवार, दत्ता पवार, गणेश आलावणे, आकाश साबळे, अक्षय जरे, संकेत देवकर, सोमा धोंडे, तेजस काळे, ऋषि धसाळ, कृष्णा नानेकर, उद्धव हापसे, संदीप गायकवाड, राजेंद्र परदेशी, सचिन शेजूळ आदींनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत