शासनाची कर वसूली भरून सहकार्य करावे- प्रांताधिकारी पवार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शासनाची कर वसूली भरून सहकार्य करावे- प्रांताधिकारी पवार

  वळण(गोविंद फुणगे)      शासनाची कर वसुली भरून सर्व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांतअधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.ते राहुरी तालु...

 वळण(गोविंद फुणगे)

     शासनाची कर वसुली भरून सर्व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांतअधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.ते राहुरी तालुक्यातील वळण येथे बोलत होते.

       राहुरी तालुक्यातील वळण,प्रिंपी-वळण, मांजरी, राहुरी खुर्द, देसवंडी, कोंढवड, शिलेगव,मानोरी, केंदळ आदिंसह गावात प्रांतअधिकारी अनिल  पवार तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी भेटी देऊन पाहणी केली.प्रसंगी  तलाठी- मंडलाधिकारी यांना वसुली करण्याबाबत सुचना केल्या आहेत.त्यामधे जमीन महसूल  , बिगरशेती, अनधिकृत बिगरशेती,  तडजोड शुल्क, ४२ ड, अनाधिकृत तुकडे,गौण खनिज दंड वसुली आदिंसंदर्भात तसेच शिक्षण कर वसुली संदर्भात देखील तलाठी यांना सुचना केल्या आहेत नागरीकांनी देखील सर्व शासनाचे वसुली कर भरून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी  करण्यात आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे वळण तलाठी कार्यालयात भेटी संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य अशोक कुलट,सुदाम शेळके, फकिरचंद फुणगे,अदिनाथ कार्ले,मंडलाधिकारी भाऊसाहेब मेहञे, तलाठी रविंद्र बाचकर,महसुल कर्मचारी बाळासाहेब खुळे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत