प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्याला भगदाड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्याला भगदाड

  आंबी (वेबटीम) राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला भगदाड पडल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला...

 आंबी (वेबटीम)


राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर मांडवे बंधाऱ्यावरील पुलाला भगदाड पडल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी कोल्हार येथील नगर-मनमाड रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने बेलापूर वरून राहुरीच्या दिशेने वळवली होती. त्यातील बहुतांश वाहने ही गंगापूर  मांडवे बंधार्‍यावरून ये-जा करत होती. या अवजड वाहतुकीमुळे पुलाला भगदाड पडले असावे अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली.

अगोदरच हा पूल जुना व कमकुवत झाला आहे. बंधाऱ्याला ठिकाणी गळतीही लागली आहे. गंगापूर व मांडवे मांडवे येथील नागरिक दैनंदिन दळणवळणासाठी याच बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करत असतात. भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष घालून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. गंगापूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश खांडके यांनी लोणी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता यांना पत्र पाठवून भरदाड पडलेल्या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करणेकामी विनंती केली आहे.

गंगापूर-मांडवे बंधाऱ्यावरून प्रवाशांची कायम वर्दळ असते. पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी. तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करावा.

- सतिष खांडके (प्रथम लोकनियुक्त सरपंच, गंगापूर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत