कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात राजरोस सुरू असलेल्या गो वंश हत्येस पोलीस खात्याबरोबर नगर पालिका देखील जबाबदार आहे असे परखड मत लोक स्वराज्य आंद...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरात राजरोस सुरू असलेल्या गो वंश हत्येस पोलीस खात्याबरोबर नगर पालिका देखील जबाबदार आहे असे परखड मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात चार सहा महिन्यातून एकदा मोठ्या प्रमाणावर गो वंश हत्येच्या घटना समोर येतात मात्र कोपरगाव नगर पालिकेने मनाई वस्ती मध्ये सुज्ज खाटीक खाना बांधून दिला आहे, असे असताना संजय नगर सारख्या भर वस्तीत राजरोस पणे गो वंश हत्येचा गुन्हा घडतो व सदर गुन्हा उघडकीस आल्या नंतर मोठा आकांड तांडव केला जातो.मात्र अश्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय पोलीस खात्याच्या अर्थपूर्ण तडजोडीतून सुरू असतो या पूर्वी पोलीस उपाधीक्षक यांनी या ठिकाणी असा गुन्हा उघड झाल्यास संबंधीत हद्दीच्या बिट हवालदार यांचेवर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले होते मात्र याच ठिकाणी अशा प्रकारे दोन वर्षात तीन चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस विभाग जसा या गुन्ह्यास जबाबदार आहे तशी नगर पालिका देखील जबाबदार आहे नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कत्तलखाण्यावर नियंत्रण ठेवले जाते. तसेच मनाई वस्तीत किती व कोणती जनावरे कापली जातात याची नोंद आरोग्य विभागाने ठेवणे आवश्यक आहे तसेच या भागात विक्री करणारे गोमांस दुकानावर नगर पालिकेच्या वसुली विभागाचे नियंत्रण असते .त्यामुळे या गोवंश हत्येस पोलीस प्रशासन जसे जबाबदार आहे तसेच नगर पालिका देखील जबाबदार असून नगर पालिकेने संबंधित आरोग्य व वसुली विभागाच्या कर्मचारी यांचेवर कारवाई करावी असे या पत्रकात म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत