कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी माझी वसुंधरा अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत स...
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी माझी वसुंधरा अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वसुंधरा अभियांना अंतर्गत गोदामाई प्रतिष्ठान आणि नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमानाने नदीपात्रात आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.या उपक्रमात अनेकांनी श्रमदान करुन स्वच्छता मोहिम राबविली आहे.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे,नगर अभियंता दिंगबर वाघ,सुनिल आरणे,गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे,ऋतुजा पाटील,नगरसेवक जनार्दन कदम,शिवाजी खांडेकर,सत्येन मुंदडा,यांच्यासह नागरिक तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत