कोपरगाव प्रतिनिधी ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेस भारत सरकारचे स्किल इंडिया अंतर्गत राष्ट्रीय शहरी व ग्रामिण कॉम्प्युटर साक्षरता मिशन यांची ...
कोपरगाव प्रतिनिधी
ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेस भारत सरकारचे स्किल इंडिया अंतर्गत राष्ट्रीय शहरी व ग्रामिण कॉम्प्युटर साक्षरता मिशन यांची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थाप्रमुख परशराम साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात साबळे यांनी सांगितले की भारत सरकारच्या शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील एकमेव संस्थेस स्किल इंडियाची मान्यता मिळाली असून या द्वारे एकूण २५८ नवीन कोर्सेस उपलब्ध झाले असून यात कॉम्प्युटर, अकौंटिंग, पार्लर,टेलरिंग, पत्रकारिता,इलेक्ट्रिकल, मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप रीपेअरिंग, शिक्षक असे विविध क्षेत्रातील भरपूर कोर्सेस उपलब्ध झाले असून कमीत कमी फी मध्ये तीन महिने ते दोन वर्षे कालावधीचे इ ५ वी ते ग्रॅज्युशन शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी यास प्रवेश घेऊ शकतात .
सदर कोर्स पूर्ण झाल्यानंतर भारत सरकार मान्यता प्राप्त नॅशनल अर्बन रूरल कॉम्प्युटर लिटरेसी मिशन या संस्थेचे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळेल अशी माहिती साबळे यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत