उंबरे : वेबटीम उंबरे गावात पाणी प्रश्न बिकट आहे, गेल्या 25 वर्षात आलटून पालटून सत्ता भोगणार्यांना गावाचा हा पाणीप्रश्न सोडवता आला ना...
उंबरे : वेबटीम
उंबरे गावात पाणी प्रश्न बिकट आहे, गेल्या 25 वर्षात आलटून पालटून सत्ता भोगणार्यांना गावाचा हा पाणीप्रश्न सोडवता आला नाही, त्यामुळे मत मागण्याचा देखील त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, त्यामुळे जनतेने आता जागे होण्याची गरज आहे. या निवडणुकीत जनतेने आम्हाला सत्ता दिल्यास स्व खर्चातून गावासाठी पाणी प्रकल्प उभारू, अशी मोठी घोषणा गणराज शेतकरी मंडळाचे युवानेते डॉ रामकृष्ण ढोकणे यांनी केली. दरम्यान, एकीकडे जनता जागी झाली असताना दुसरीकडे पैशांचे आमिष दाखवून मते विकत घेण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत, मात्र आता मायबाप जनता ठरवणार की तरुणांच्या हातात सत्ता देऊन डोक्यावरचा हंडा उतरवायचा की पुन्हा पैसे घेऊन आपले बहुमोल मते विकत सत्ताधार्यांना गाव लुटायला द्यायचा, अशी चर्चा गावात सुरू आहे.
डॉ ढोकणे म्हणाले, उंबरे गावात पाण्याची समस्या बिकट आहे, येथील ग्रामपंचायत देखील भ्रष्टचाराने पोखरली आहे, गावात कोणताही विकास नाही, सरपंचाच्या खुर्चीचा लिलाव सुरू आहे, आरोग्य, शिक्षण, कृषी आदी क्षेत्रातील प्रश्न रखंडले आहेत, आशा परिस्थिती निवडणूक बिनविरोधचा प्रस्ताव आम्ही दिला होता, मात्र केवळ स्वार्थासाठी त सत्तेसाठी सत्ताधारी मंडळींनी आमचा प्रयत्न हणून पाडला, असो, आता जनता जागी झाली आहे, आम्ही लहानाचे मोठे झालो तरी येथे काहीही विकास झाला नाही, साधी सार्वजनिक मुतारी देखील येथे उभी करता आली नाही. आता पुन्हा हेच मंडळी आमच्याशिवाय गाव चालू शकत नाही, असे बोलून दाखवत आहेत, यांचा गर्वहरण करण्याची ही योग्य वेळ आली आहे, या निवडणुकीत गणराज शेतकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, आम्हाला गावात एक संधी द्या, आम्ही विकास करून दाखवतो, त्यांना 25 वर्ष दिली आम्हला 5 वर्ष द्या, एकदा विश्वास दाखवा, स्वाभिमान जागा ठेवा, पैसे घेऊन मत विकू नका, आपल्या पीडियत गेल्या आता पुढची पिढी तरी वाचवा, आजही येथे लहान चिमुरड्या मुलींसह माझ्या माय भगिनींच्या डोक्यावर हंडा पाहून वाईट वाटत, त्यामुळे गावासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळें या निवडणुकीत सत्ताधार्यांना घरी बसवा व तरुणांना संधी द्या, जनतेने गणराज शेतकरी मंडळास साथ देऊन सत्ता दिल्यास आम्ही स्वखर्चाने गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारू असा मी मारुती मंदिरासमोर शब्द देतो, आता फकत जनतेणे आतापर्यंत केलेल्या चुका पुन्हा करू नये, मी हात जोडतो, पैशे घेऊन मत विकू नका, माझा हा शेवटचा प्रयत्न असेल, मला साथ द्या, तुम्ही विकला गेलात तर वाटोळे होईल, त्यामुळे आपली पिढी आपले गाव वाचवा, अन्यथा तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही, अशी खत व्यकट केेेली।


Real strike
उत्तर द्याहटवा