उंबरे : वेबटीम उंबरे गावच्या निवडणूक प्रचाराची आज भव्य रॅली आणि जाहीर सभेने सांगता झाली. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्य...
उंबरे : वेबटीम
उंबरे गावच्या निवडणूक प्रचाराची आज भव्य रॅली आणि जाहीर सभेने सांगता झाली. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या रॅलीने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा सुरू आहे.
उंबरे ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी गटाविरोधात जेष्ठ नेते साहेबराव दुशिंग, कारभारी ढोकणे, माऊली क्षीरसागर, गंगाधर दादा ढोकणे, अशोक राव ढोकणे, संदीप दुशिंग बाळासाहेब पटारे, विलासराव ढोकणे, लक्ष्मण पटारे आदींनीप्रा रामकृष्ण ढोकणे यांच्या पुढाकारात गणराज शेतकरी मंडळ स्थापन केले आहे. यामध्ये सुशिक्षित व नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. तर सत्ताधारी गटाने काही जुने नवे चेहरे दिले आहेत, दरम्यान, प्रचारात सुरुवातीपासूनच गणराज शेतकरी मंडळाने आघाडी घेतली. हायटेक प्रचार यंत्रणा राबवून मंडळाने जनतेची मनं जिंकली आहेत,व 15 तारखेला मतं देखील जिंकू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे, तर विरोधी गटात अजूनही पक्षाचे अंतिम उमेदवार ठरत नाही, अशी चर्चा आहे, त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. आज सकाळी 10 वाजता गणराज शेतकरी मंडळाने गावातील प्रभाग क्रमांक 5 मधून भव्य रॅली काढली. या रॅलीत 500 पेक्षा अधिक बंधू भगिनी सहभागी झाल्या होत्या, त्यात तरुणांची उपस्थिती मोठी होती, ही रॅली पाहणाऱ्यांना आजच उंबरेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये इतिहास घडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला, रॅलीनन्तर दुपारी जाहीर सभा झाली.
सभेत, जेष्ठ नेते साहेबराव दुशिंग यांनी गावातील समस्यांचा लेखाजोखा मांडत गणराज शेतकरी मंडळाला विजयी करा तसेच सर्वसामान्य कुटुंबातील सोनालीताई शेजुळ यांना निवडून देत एक इतिहास घडवा, असे आवाहन केले, कारभारी पाटील ढोकणे व अशोक ढोकणे यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला, सरपंचाच्या खुर्चीचे वस्त्रहरण करण्याची टीका करत मुरूम विक्रीतील पैसे, वाळू लिलाव इत्यादी उकरून काढली, यावेळी त्यांनी गावच्या विकासावरून सत्ताधारी मंडळावर हल्ला चढवला, माऊली क्षीरसागर यांनी आपल्या प्रगल्भ वाणीतून विचार मांडत गणराज शेतकरी मंडळाच्या विजयाचा संकल्प केला, प्रभाग 1 मधून बिनविरोध निवडून असलेल्या सारिका रामकृष्ण ढोकणे यांनी आपल्या भाषणातून गावचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला तर प्रा रामकृष्ण ढोकणे सर यांनी 15-0 करण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. तसेच उंबरे गावची शुद्ध पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करू, असे आश्वासन दिले. युवानेते अनिल ढोकणे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भरीमाड करत या धर्मयुध्दात तरुणांची मुठ बांधली, तर गुंजाळ भाऊसाहेब यांनी मंडळाला आशीर्वाद दिले, यावेळी झालेली गर्दी ही विजयाचे प्रतीक ठरताना दिसली


कोणत्याही टिप्पण्या नाहीत