ग्रामपंचायतमधील फीक्स डिपाॅझीट पावत्या यांनी मोडल्या,पट्या थकविल्या आता हिशोब द्या;बाबा खुळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ग्रामपंचायतमधील फीक्स डिपाॅझीट पावत्या यांनी मोडल्या,पट्या थकविल्या आता हिशोब द्या;बाबा खुळे

  वळण/गोविंद फुणगे       ग्रामपंचायत मधील ३ लाख ७५ हजार रुपयांची फीक्स डिपॉझिट पावती  या मंडळींनी मोडली. आमच्या काळात रॅग्युरर पाणी पट्टींचा...

 वळण/गोविंद फुणगे 

     ग्रामपंचायत मधील ३ लाख ७५ हजार रुपयांची फीक्स डिपॉझिट पावती  या मंडळींनी मोडली. आमच्या काळात रॅग्युरर पाणी पट्टींचा भरणा होता.पण आता लाखों रूपये पाणी पट्टी हि थकीत असुन पाणी बंद देखील होणाची शक्यता आहे आणि हे हमी घेतात की पाणी कधीही बंद नाही. ती एक संथा आहे.थकबाकी भरणा झाला नाही तर काहीही होऊ शकते.त्यामुळे यांचा यांनाच यांना ताळमेळ नव्हता हे आता मते मागायला आल्यावर यांनी कोणती विकास कामे केली आहे ते मतदारांनी विचारावे असे आरोप परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच बाबा खुळे यांनी केले आहे.ते वळण(ता.राहुरी)येथे बोलत होते.

     राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचार सांगता सभेत खुळे बोलताना पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना पाणी पट्टी ३ लाख २१ हजार रूपये  होती,तर थकबाकी फक्त ९७ हजार होती.तर आता थकबाकी हि ४ लाख ४२षहजार रूपये इतकी आहे.इतकी तफावत आज आहे यावरून कोणी कसे काम केले ये समजते.पाच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही सर्व सदस्य हे एका कुटुंबातील सदस्यांप्रमाणे राहिले पारदर्शक कारभार केला होता.आता सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळ उरलेला नाही यांच्यातच ताळमेळ नसल्याने अनेक गोष्टी समोर आल्यात गावाने बघितल असल्याचे देखील खुळे यांनी म्हटले आहे.


याप्रसंगी परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष विजय मकासरे यांनी त्यांचा जाहीरनामा देताना सांगितले की, गावात सुसज्ज व्यायामशाळा बनवणार, झोपडपट्टी दुरुस्ती करून झोपडपट्टीत पाणी जाणार नाही याची दक्षता घेणार, गोलवड वस्ती ठाकर वस्ती आदीं वस्त्यांवर रस्ते बनवणार,  गावात एसटी स्टॉप बनवणार, गावातील सर्व वाड्या-वस्त्यांवर पक्के रस्ते बनवणार काळे वस्ती-वस्ती ठाकर वस्तीसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणार दारिद्ररेषे मध्ये वंचित असणाऱ्या सर्व कुटुंबाचे नावे समाविष्ट करणार. ग्रामपंचायत फलकावर प्रत्येक महिन्याचा जमाखर्च लिहून पारदर्शक कारभार चालवणार. तीनही समाजाच्या स्मशानभूमीचे वीज आणि पाणी प्रश्न सोडविणार गावात मोफत हॉस्पिटल सुरू करणार. तसेच गावात नियमित कर भरणाऱ्यांना मोफत पिठाची गिरणी सुरू करणार. 


गावांमध्ये मुळा  धरणाच्या पाण्याचा अतिरिक्त स्वतंत्र वापरासाठी पाणी उपलब्ध करून देणार.  विधवा सचेच वृद्ध  महिलांसाठी शासनाच्या सर्व योजना राबविणार असुन  गावासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका लोकार्पण करणार तसेच गावात स्वच्छतागृह बांधणार असे मकासरे यांनी सांगितले.

 यावेळी धनंजय आढाव यांनी विरोधकांवर आरोप करताना सांगितले की,सत्ताधा-यांना सत्ता हि आपल्याआवती भोवती पाहीजे होती,म्हणून यांनी सुरक्षित तरूणांना डावलले आहे.यांनी पाच वर्षात कसा कारभार केला आहे ते सर्वांना माहीत आहे म्हणून जनता आता नक्कीच परिवर्तन घडवेल.याप्रसंगी  कारभारी खुळे, ललिता आढाव, मनोज मकासरे, रमेश खुळे, ऋषिकेश आढाव,मधुकर आढाव,रमेश काळे,काशिनाथ गोलवड,दादा बर्डे, विजय बनकर,सुजाता खुळे, लताबाई जाधव आदी उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत