कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहराला नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले असून राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असताना कोपरगाव नगर पालिका हद्द...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहराला नगरपालिका निवडणुकीचे वेध लागले असून राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असताना कोपरगाव नगर पालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण थाटू लागले आहेत मात्र या अनधिकृत अतिक्रमना कडे नगर पालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी कोपरगाव नगर पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण करून अनेकांनी आपली दुकाने थाटली होती मात्र वाहतुकीला अडथळा होतो म्हणून ही अतिक्रमण काढून टाकली त्या करिता नगर पालिकेला मोठी कसरत करावी लागली त्याच प्रमाणे ही अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल, पोलीस प्रशासनावर मोठा खर्च झाला या शेकडो दुकानदारांना विस्थापित व्हावे लागले म्हणून अनेक राजकीय नेत्यांना या राजकीय फटका देखील बसला दहा वर्षात या विस्थापित टपरी धारकांना पुन्हा जागा मिळावी म्हणून मोठा संघर्ष करावा लागला मात्र अद्याप या विस्थापित टपरी धारकांचा खोका शॉपचा प्रश्न सुटला नाही.असे असताना सर्वच राजकीय पक्षांना पुढील वर्षात होणाऱ्या नगर पालिका निवडणुकीचे वेध लागले या निवडणुकी पूर्वी राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोपणाची धुळवड उठवली असल्याचे जाणवत आहे मात्र सद्या धारणगाव रोड,येवला रोड ,मुख्य रस्त्यावर अशा नगर पालिकेच्या विविध रस्त्यावर विविध व्यावसायिक पुन्हा जागा धरून आपली दुकाने थाटू लागले अनेक ठिकाणी रातोरात नवीन टपऱ्या उभ्या राहत आहे नगर पालिका वसुली विभाग व अधिकारी रोज या नवीन टपरी धारकांकडून वीस ते पन्नास रुपयांच्या पावत्या वसूल करत असतात. मात्र एखादा व्यवसाय करायचा म्हटल्यावर लाखो रुपये खर्च करून गाळे किंवा जागा घेण्यापेक्षा व्यावसायिक सरळ नगर पालिकेतील वसुली विभागातील अधिकाऱ्यांना व स्थानिक भावी नगर सेवकांना हाताशी धरून या टपऱ्या व अतिक्रमणे करताना दिसत आहे मात्र नगर पालिकेतील वसुली विभागाच्या अर्थ पूर्ण तडजोडी शिवाय हे शक्य नाही.
अद्याप मागील विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा या रस्त्यावर होणारी नवीन अतिक्रमणे ही भविष्यात नगर पालिका प्रशासनाला डोकेदुखी ठरणार आहे त्या मुळे नगर पालिका प्रशासनाने वेळीच या नवीन व अनधिकृत टपरी धारकांना आवर घालावा असेही या पत्रकात म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत