कोपरगाव(वेबटीम) वायू प्रदूषण रोखणे ; इंधन बचत व आरोग्य चांगले राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू झालेल्या " माझी वसुंधरा ...
कोपरगाव(वेबटीम)
वायू प्रदूषण रोखणे ; इंधन बचत व आरोग्य चांगले राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू झालेल्या " माझी वसुंधरा " या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पर्यावरण संवर्धन जाणीव जागृती निर्माण करणे या अभियानाच्या अनुषंगाने कोपरगाव नगर पालिकेच्या वतीने शुक्रवार दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या सायकल रॅलीमध्ये मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक मंदार पहाडे,विरेंन बोरावके,जनार्धन कदम,सत्येन मुंदडा,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे ,मनोहर कृष्णाणी, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार,सुनील गंगूले,समीर वर्पे,गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे,चिरंजीव अंश कृष्णाणी,यज्ञ काळवाघे कुमारी ईशा गंगूले,नगरपालिकेचे बांधकाम अभियंता दिगंबर वाघ,ज्ञानेश्वर चाकणे महारुद्र गालट ,सर्व आजीमाजी नगरसेवक अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरी या सायकल रॅली मध्ये सहभागी होऊन वृक्ष संवर्धन ही काळाची गरज इंधन वाचवा,प्रदूषण टाळा पर्यावरणाचा समतोल राख हा संदेश देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक,गोदावरी पेट्रोल पंप,कोपरे मार्ग बैल बाजार रोड, टिळकनगर,बँक रोड पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गे ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पर्यायावर वृक्ष संवर्धनाविषयी विविध संदेश देणारे फलक लावण्यात आले होते.
तर अंश कृष्णाणी याने वृक्षाचा वेष परिधान केला होता ही वेशभूषा या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले होते आठवड्यातून एक दिवस तरी नो व्हेईकल डे जरी पाळला तर होणारे वायू प्रदूषण निश्चितच कमी होण्यास मदत होईल व इंधनाची देखील बचत होईल त्यामुळे नागरिकांनी एक दिवस तेरी नो व्हेईकल डे पाळत सायकलचा वापर करावा असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत