राहूरीतील भाजपचा मोठा पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील भाजपचा मोठा पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर?

देवळाली प्रवरा(वेबटीम)  राहूरी तालुक्यातील भाजपला लवकरच खिंडार पडणार असून भाजपचा एक मोठा पदाधिकारी लवकरच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रव...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

 राहूरी तालुक्यातील भाजपला लवकरच खिंडार पडणार असून भाजपचा एक मोठा पदाधिकारी लवकरच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.

ना.प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर राहूरी तालुक्यात राष्ट्रवादीमय वातावरण झाले.अनेक ग्रामपंचायता ताब्यात घेऊन राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिध्द केल्याने राष्ट्रवादी गोटात प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

दरम्यान भाजपचा एक पदाधिकारी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मध्यंतरी सदर पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते अडचणीत सापडले असता विखे-कर्डीले यांनी मदत न केल्याने नाराज पदाधिकारी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँगेसमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता आहे.या पदाधिकाऱ्याचे कार्यकर्त्यांनी अडचणीच्या वेळे पक्षाचे  नेते मदत करीत नसेल तर तो पक्ष  काय कामाचा? आता बस झालं राष्ट्रवादी मध्ये चला असा आग्रह धरला असल्याने सदर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याने सूत्रांकडून समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत