राहुरीतील सेतू केंद्र बंद नामदार तनपुरेंचे कारवाईचे आदेश ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील सेतू केंद्र बंद नामदार तनपुरेंचे कारवाईचे आदेश !

  राहुरी/गोविंद फुणगे  राहुरी खुर्द येथील सेतु कार्यालयावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट दिली माञ याठिकाणी सदर सेतु कार्यालयात...

 राहुरी/गोविंद फुणगे 


राहुरी खुर्द येथील सेतु कार्यालयावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट दिली माञ याठिकाणी सदर सेतु कार्यालयात हे बंद अवस्थेत आढळून आल्यातने तसेच आवश्यक माहिती चे फलक याठिकाणी आढळून न आल्याने राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांनी सदर  सेतू चालकाची तात्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश तहसीलदार शेख यांना दिले आहेत.त्यामुळे तालुक्यातील सेतू चालकांचे धाबे दणाणले आहेत मात्र सर्वसामान्य नागरिकांनी सदर भेटीदरम्यान तहसीलदार राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.


   तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सुविधा चा लाभ मिळण्यासाठी तसेच विविध दाखले मिळण्यासाठी सेतू कार्यालय हे स्थापन करण्यात आले आहेत मात्र अनेक सेतू चालकांकडून मनमानी कारभार करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू होते यासंदर्भात तालुक्यातील अनेक नागरीकांच्या तक्रारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार काही सेतू केंद्राना भेटी देण्याच्या बाबतीत राज्यमंत्री तनपुरे यांनी ठरवले आज दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळीच्या दरम्यान राहुरी खुर्द येथील एका सेतू चालक चालक केंद्रावर त्यांनी अचानक भेट दिली मात्र या ठिकाणी सदर सेतू कार्यालय हे बंद अवस्थेत आढळून आले तसेच सदर सेतू कार्यालयावर नागरिकांना मार्गदर्शन करणारे फलक तसेच शासनाच्या विविध दाखल्यांचे संदर्भात असणारे फलक हे आढळून आले नसल्याने मंत्री तनपुरे यांनी सदर चालकाला तात्काळ बोलून घेतले या ठिकाणी सदर सेतुचालकाचा मनमानी कारभार समोर आला प्रसंगी मंञी तनपुरेंनी तात्काळ चोकशीचे तहसीलदारांना दिले आहेत तसेच  नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या सेतू चालकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केला आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सूचना आल्यानंतर सदर सेतू कार्यालय वर आमच्या पथकाला पाठवणार असून सदर सेतू चालक दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल .- तहसीलदार फसियोद्दीन शेख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत