कोपरगाव (वेबटीम) शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त कोपरगाव रिक्ष...
कोपरगाव (वेबटीम)
शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुखांना व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त कोपरगाव रिक्षा स्टँड येथे नेत्रदीपक फुलांची आरास करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी केलेले व विजयी झालेल्या शिवसैनिकांचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व सर्व शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झरा,लाखो शिवसैनिकांचे दैवत, या प्रखर शिवतेजाने मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वासाचा वन्ही चेतवला. स्वाभिमानाची उर्मी जागवली, मनामनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला. शिवसेनाप्रमुख म्हणजे देव, देश आणि हिंदुत्वरक्षणाचे "सरसेनापती" असे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे म्हणाले. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी व मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झपाटून काम करा असा मंत्र शिवसेनाप्रमुखांनी दिला होता व हाच मंत्र घेऊन कोपरगाव शहर शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहणार असल्याचे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक किरण भोईर,राजेंद्र डागा,कुक्कूशेठ सहानी, अजेय गर्जे,राजेंद्र सालकर,भाऊसाहेब जाधव,दिलीप अरगडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,विधानसभा संघटक असलम शेख,एसटी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे,युवासेना सहसचिव सुनील तिवारी,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,अंकुश वाघ वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवानेते विक्रांत झावरे, उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,गगन हाडा,भूषण पाटणकर शहर संघटक बाळासाहेब साळुंके, नितीन राऊत,सहसंघटक वैभव गिते, विभाग प्रमुख रफिक शेख,राहुल हंस्वाल,मयूर दळवी,रामदास शिंदे, समीर शेख,संतोष झावरे,अंबादास वाघ,संजय बाविस्कर, निशांत झावरे,अजय दळे,
वाहतूक सेनेचे उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट, किरण कुऱ्हे,शहरप्रमुख जाफर सय्यद, उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार,किरण अडांगळे,अविनाश वाघ,पिनू सावतडकर,वैभव हलवाई,संदीप कपिले,श्रीपाद भसाळे,नरेंद्र बैरागी, भूषण वडांगळे,रितेश राऊत,महेश उगले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,नगरसेविका वर्षा शिंगाडे, उपतालुकाप्रमुख सारिका कुहिरे, शहरप्रमुख राखी विसपुते,उपशहरप्रमुख अश्विनी होने, शितल चव्हाण,अक्षता आमले,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत