देवळाली प्रवरा (विशेष प्रतिनिधी) राहुरी कारखाना येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून ऑनलाईन अभ्यास करत नाही,(शैक्षणिक फि न दिल्याने) ...
देवळाली प्रवरा (विशेष प्रतिनिधी)
राहुरी कारखाना येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून ऑनलाईन अभ्यास करत नाही,(शैक्षणिक फि न दिल्याने) या कारणाने पालकांच्या हातात दाखला ठेवला. दोन्ही मुली अजूनही शाळाबाह्य आहे. एक दिवसा पेक्षा जास्त काळ शाळाबाह्य विद्यार्थी ठेवता येत नाही.राहुरीचे गट शिक्षणाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी वृत्तपञातील वृत्तावरुन शैक्षणिक संस्थेची शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.गारुडकर शैक्षणिक संस्थेची काय चौकशी करतात? कागदीघोडे नाचवून संस्थेच्या बाजुने अहवाल सादर करतात की काय याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नगरसेवक आदिनाथ कराळे व अन्य पालक या शाळेतून दाखला काढण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे नगरसेवक कराळे यांनी सांगितले.
ऑनलाईन अभ्यास करत नाही.(शैक्षणिक फि भरली नाही) या कारणाने गेल्या दोन दिवसांपूर्वी न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एका सलून व्यवसायिक पालकांच्या हातात त्याच्या दोन पाल्याचा दाखला दिला होता. त्याबाबत पालकांनी अभ्यास तर पूर्ण आहे मात्र फी भरली नाही म्हणून दाखला दिला असल्याचे स्पष्ट केले होते.
प्राचार्यांनी संबंधित पालकाला 'गेट आऊट' म्हणून बाहेरचा रस्ता दाखवला. स्थानिक नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी शाळेच्या भूमिकेवर टीका करत स्वतःच्या पाल्यांचे दाखले काढण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कराळे यांच्या भूमिकेला साथ देत अन्य पालक देखील संबंधित शाळेतून आपल्या पाल्याचे दाखले घेण्याच्या तयारीत आहेत.
आवाज जनतेचा या वेब टिमने या शैक्षणिक संस्थेचा बुरखा फाडल्या नंतर शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात पालकांमध्ये भिन्नभिन्न प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या शाळेत शिस्तीचा अवास्तव बडगा उगारला जात असल्याचे सांगितले. सततचा त्रास व अपमानास्पद वागणूक यास वैतागून काही पालकांनी आपल्या पाल्यांचे यापूर्वीच दाखले घेऊन अन्य शाळेत दाखल केले आहेत. त्यांनी देखील शाळेमध्ये अनेक वेळा विद्यार्थ्यांसमोर पालकांचा अपमान झाल्याच्या घटना सांगितल्या.
स्थानिक उच्च भ्रु असल्याने पालकांना बाहेरच्या लोकांच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्यापेक्षा आपल्या माणसाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेत आपल्या माणसाला साथ दिली.परंतू आपला माणूस आपल्याच माणसांची जिरवण्यासाठी निघाला आहे.पालकां बरॉबर बोलताना तारतम्य न ठेवणे संस्थेचे सचिव तुमच्या वडिलांचे नोकर आहे का? असे पालकांना विचारणे यामुळे अनेक पालकांनी आपले दाखले घेवून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे पसंत केले आहे.
दरम्यान 'आवाज जनतेचा' या वेब टिम बरोबरच वृत्तपञाच्या प्रतिनिधींनी या शैक्षणिक संस्थेचा दाखला पालकाच्या हातात हा मुजोर पणा उघडकीस आणल्या नंतर राहुरी पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी "आवाज जनतेचा" व अन्य वृत्तपञात प्रकाशित झालेल्या वृत्तावरुन राहुरी कारखाना येथील न्यु इंग्लिश स्कुलची चौकशी करण्याकरीता स्वतंञ शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर यांची नियुक्ती केली आहे.गारुडकर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. शैक्षणिक संस्थेकडे खुलासा मागितला असल्याचे त्यांनी सांगितले. गारुडकर यांनी चौकशी करताना कागदी घोडे नाचवण्या पेक्षा ज्या पालकांच्या हातात दाखले देवून त्यांच्या पाल्यांना शाळाबाह्य विद्यार्थी केले.त्यांची समक्ष भेट घेवून त्यांचे जाब जबाब नोंदविल्यास खरा प्रकार समोर येणार आहे. परंतू चौकशी अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवले तर संस्थाचालकांचा खरा प्रकार समोर येणार नाही.संस्थेची चौकशी करताना एकतर्फी चौकशी झाल्यास चौकशी अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत