कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत अनेक वेळा केंद्र व राज्य शासन दरबारी पत्रव्यवहार करणारे समाजसेवक राजेशजी मंटाला यांनी प्र...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत अनेक वेळा केंद्र व राज्य शासन दरबारी पत्रव्यवहार करणारे समाजसेवक राजेशजी मंटाला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इमेल पाठविण्याचे जन आंदोलन सुरू केले असून त्यास आपण प्रतिसाद द्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.
कोपरगावकरांनी २४ ते २६ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या जनआंदोलनात सहभाग घेऊन पाणीप्रश्नी या विनामुल्य आंदोलनात केवळ एक ईमेल करायचा आहे.कदाचित आपला एक ई-मेल ,असे सर्वांनी जर यात सहभाग घेतला तर हजाराच्या प्रमाणात जर इमेल गेले तर निश्चित कोपरगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास मंगेश पाटील यांनी व्यक्त केला.
याबाबत माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील,माजी नगरसेवक श्री.दिनारजी कुदळे, प्रसिद्ध अकौंटन्ट श्री.नितीनजी डोंगरे यांनी भेट घेवून राजेशजी मंटाला यांना पाठींबा दिला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत