टेंडरचे जादूगार , आरक्षण उठविण्याचे शिल्पकार व कर्ज बुडवे नगराध्यक्ष अर्थात विजय वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टेंडरचे जादूगार , आरक्षण उठविण्याचे शिल्पकार व कर्ज बुडवे नगराध्यक्ष अर्थात विजय वहाडणे

  कोपरगाव(प्रतिनिधी) टेंडरचे जादुगार व आरक्षण उठविण्याचे शिल्पकार कर्तृत्ववान, कर्ज बुडवे असे विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे  असल्याचे माजी...

 कोपरगाव(प्रतिनिधी)

टेंडरचे जादुगार व आरक्षण उठविण्याचे शिल्पकार कर्तृत्ववान, कर्ज बुडवे असे विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे  असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी म्हणून त्यांच्यावर केलेल्या टिकेवर सडेतोड उत्तर देऊन चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

सातभाई यांनी म्हणाले की, विद्यमान नगराध्यक्ष पत्रकार परिषद घेतली व आरक्षणाच्या मुद्दयावर खुलासा केला. ते माजी नगराध्यक्ष कै.बाळासाहेब सातभाई, कै.माधवराव पाटील आढाव, सौ.कांचनताई काले यांच्या  सन 1985 ते सन 2002 या कालावधीत आरक्षण उठविण्याचे वेळोवेळी ठराव झालेले आहेत. जर हे त्याकाळात त्या ठरावानुसार जर हे आरक्षण रद्द झाले असते तर 2012 मधील विकास आराखड्यात या आरक्षणांचा समावेश कसा झाला असता ?  सन 2017 मध्ये मुळ जागा मालकांना मा.उच्चन्यालयात जाण्याची गरजच काय पडली असती ? याचाच अर्थ असा जुन्या ठरावानुसार येईलेई आरक्षण रद्द झालेले नाहीत व हे आरक्षण रद्द करण्यासाठी आपण जी कलाकुसर करत आहात ही  कला जनता पाहात आहेत.

             आमच्या माहीतीनुसार विकास आराखड्यातील या आरक्षणांच्या समावेशानंतर मुळ मालक दहा वर्षापर्यंत आरक्षणाची जागा परत किंवा त्या जागेचा मोबदला सन 2022 पर्यंत कायदेशीर रित्या मागु शकत नव्हते. परंतु आपल्या जादुगरीमुळेच सन 2017 साली मुळ जागामालकांना मा.उच्चन्यायालयात जाण्यास कुणी सुचविले ? व त्याचवेळेस नगरपालिकेकडुन या आरक्षणाबाबत योग्य ती  बाजु न मांडण्याची खबरदारी कुणी घेतली ? त्यामुळे तो निकाल नगरपालिकेच्या विरोधात गेला यातच आपली हुशारी दिसुन येते. परंतु आजही आपण हे आरक्षण वाचविणे कामी फेर पुर्नविचार याचिका दाखल करु शकतो तसा ठराव ही भाजप – शिवसेना नगरसेवकांनी बहुमताने मंजुर करुन दिलेला आहे, तरी आपण जनहिताचा निर्णय घ्यावा असे संजय सातभाई यांनी म्हंटले आहे.

                माजी नगराध्यक्ष कै.बाळासाहेब सातभाई,कै.माधवराव पाटील आढाव, सौ.कांचनताई काले यांची नावे आपण खोटी बदनामी करण्यासाठी जाणुन बुजुन पत्रकार परिषदेत घेतली. जर या लोकांनी राजकारणात यांच्या  उभ्या आयुष्यात जर चुकीची कामे केली असती, तर जनतेने यांच्या वारसांना सतत 40 ते 50 वर्ष निवडुन दिले नसते. जनतेचा या कुटुंबांवर आजही तितकाच विश्वास व भरोसा आहे. त्या उलट आपण महाराष्ट्रात चार वर्षापुर्वी विक्रमी मतांनी निवडुन आलात व त्याच जनतेने 3 वर्षात विधानसभा निवडणुकीत आपले डिपॉझीट जप्त करुन आपल्या कामकाजाची पावतीच दिली याची तरी स्वत:ला शरम वाटली पाहिजे.

          तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदेत मुख्य मुद्दयांना नेहमीप्रमाणे बगल देवुन त्यावर चकार शब्दही बोलला नाही. ज्या रस्त्यांच्या आव्वाच्या – सव्वा रकमेच्या निविदांबाबत भाजपा-शिवसेना नगरसेवकांनी तुमच्या विरोधात आवाज उठविला व तुमची जादुगरी जनतेच्या समोर आणली त्यावर आपण एक शब्द बोलत नाहीत, हे न समजण्या इतकी जनता दुध खुळी राहीलेली नाही.

                         आपण मर्चंट बँकेच्या ठेवीदारांबद्दल कळवळा दाखविला त्या सर्व ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळालेले आहेत,याची एकदा खात्री करा. केवळ काही पतसंस्थांच्या ठेवी आपल्या सारख्या कर्ज बुडव्या लोकांमुळे  देणे बाकी आहे परंतु त्याही ठेवी देणे चुकणार नाही, त्या द्याव्याच लागतील व आपण आजपर्यंत जनतेपासुन लपविलेले आपले कर्ज ही आपल्याला भरावेच लागेल. 

                   मागील तीन चार वर्ष आपण नगरपरिषदेचा आर्थिक कारभार “ मै खाउंगा, किसी को भी  खाने नही दुंगा, एवढ्या चांगल्या पद्धतीने करुनही ” आपण अद्यापपर्यंत कर्ज का भरले नाही हे एक कोडेच आहे. आपण आपल्या मुलाखतीत अनेक मुद्यांची चर्चा केली, परंतु जे जनतेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असे रस्ते व त्याचे ज्यादा रकमेचे अंदाजपत्रक तसेच जे महत्वाचे रस्ते आहेत,त्यांचा टेंडर मध्ये समावेश देखील केला नाही. या बद्दल आपण काहीही चर्चा केली नाही याचे खुप आश्चर्य वाटते. या निविदांच्या रकमा पाहुन संपुर्ण शहरातील जनतेचे डोके गरगरायला लागले आहे.आपल्या कारभाराबद्दल एक-ना-अनेक शंका उपस्थित होत आहेत याबाबत आपण काहीही एक न बोलता विषय भरकटवण्याचे नाटक आता तरी कायमचे बंद करा असे संजय सातभाई यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत