कोपरगावचे परशराम साबळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे परशराम साबळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

  कोपरगाव(प्रतिनिधी)  महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श करण्याचे तसेच सरपंचांन...

 कोपरगाव(प्रतिनिधी)

 महाराष्ट्र राज्यातील सरपंचासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंच सेवा संघ नेहमीच कार्यरत असतो.त्याच बरोबरीने आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने संघ विविध उपक्रम राबवित असते.त्याचाच एक भाग म्हणून मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा याच धर्तीवर राज्यभरातील  विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन प्रोत्साहान देण्याचे कार्य संघ करत असते.


असाच राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी शिर्डी येथे संपन्न झाला यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल  कोपरगाव  येथील परशराम साबळे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साबळे यांची घरची परिस्थिती हालकीची  असल्याने  शिक्षणासाठी खूप धडपड करावी लागली ती धडपड समाजातील इतरांना करावी लागू नये या हेतूने २००५ साली ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करत भारत सरकार व महाराष्ट्र  शासनाची मान्यता घेत विविध  अभ्यासक्रम सुरू केले.

तसेच ग्रामिण भागातील मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबातील मुलांना इंग्रजी भाषा यावी म्हणून शासन मान्य इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करत हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविले आहे. तसेच कोरोनाच्या काळात संस्थेच्या माध्यमातून मास्क, सॅनिटायझर, फरसाण आदी वस्तूचे गरजुना वाटप केले.साबळे यांना लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच मुंबईच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१५ साली विशेष गौरव केला आहे तसेच नुकतीच  आतंरराष्ट्रीय ह्यूमन राईट मिशनच्या वतीने साबळे यांची विश्व शांती दूत म्हणून निवड केली आहे. 

या कार्याची दाखल घेत  शिर्डी येथे  झालेल्या  कार्यक्रमात सपत्नीक साबळे यांना समाजभूषण पुरस्कार समाज प्रबोधन कार ह. भ. प. निवृत्ती  महाराज देशमुख   व शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक यूनियनचे राजाध्यक्ष एकनाथ ढाकणे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, राज्याध्यक्ष विक्रम भोर आदींच्या प्रमुख उपस्थितीत  पुरस्कार वितरण  सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत