राहूरी(प्रतिनिधी) देवळाली प्रवरा येथील डॉ.सागर गडाख व सहकारी यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन अहमदनगर शहरात नव्याने सुर...
राहूरी(प्रतिनिधी)
देवळाली प्रवरा येथील डॉ.सागर गडाख व सहकारी यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन अहमदनगर शहरात नव्याने सुरू करत असलेल्या अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डॉ.सागर दत्तात्रय गडाख व त्यांचे सहकारी मित्र डॉ.अतिष केदारी तसेच डॉ.शुभम गडाख यांनी अहमदनगर एमआयडीसी येथे सर्व सोयी-सुविधांनी युक्त अँप्पल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले असून सर्व प्रकारच्या रुग्णांची सेवा पुरविण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होणार आहे.
रविवार २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, आ.अरुण जगताप यांच्यासह महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप,माजी आ.शिवाजी कर्डीले, रावसाहेब शेळके, अरुण तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके आदींसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.सागर गडाख, डॉ.अतिश केदारी, डॉ.शुभम गडाख आदींनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत