वाळू वाहतुकीसंदर्भातील चर्चेसाठी कोपरगावात बैठक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाळू वाहतुकीसंदर्भातील चर्चेसाठी कोपरगावात बैठक

कोपरगाव(वेबटीम)  कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये याविषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७जानेवारी रोजी सकाळी ११...

कोपरगाव(वेबटीम)

 कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये याविषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मिटिंग आयोजित केली असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.

वहाडणे यांनी म्हंटले की, कोपरगाव तालुक्यातून वहाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्याचा लिलाव झाल्याचे समजते.अधिकृत कोण ठेकेदार आहे हे माहित नाही.अनधिकृत बरीच नांवे व पक्ष चर्चेत आहेत.

           वाळू वाहतूक सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातून मोठमोठे अवजड डंपर,ट्रक,ट्रॅक्टर वाळू वाहतूक करणार यात शंकाच नाही.या वाहतुकीमुळे शहरातील-परिसरातील रस्त्यांची आहे त्यापेक्षा जास्त दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.अपघातांची संख्याही वाढू शकते.सध्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे. कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये यासाठी मी स्वतः उभे राहून इंदिरा पथ येथे वाळूचे अवजड डंपर अडविले होते.पणवाळूवाल्यांची दहशत असल्याने कुणीच  साथ देत नाही,बोलत नाही,विरोध करत नाही. राजकारणी मंडळीच आश्रयदाते असल्याने त्यावेळी कुणीच बोलले नाही असे वहाडणे यांनी म्हंटले.

           शहरातील रस्त्यांची दुरावस्था होऊ नये,खड्डे पडून अपघात होऊ नयेत,प्रदूषण होऊ नये म्हणून  कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये याविषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मिटिंग आयोजित केली आहे.

         कोपरगाव शहरातील जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे ही विनंती. ज्यांना कुणाशीही वाईटपणा घ्यायचाचएवनाही त्यांनी शक्यतो मिटींगला यायचे टाळावे असे वहाडणे यांनी म्हंटले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत