भोजेडे , वारी गावातील शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको अंदोलन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भोजेडे , वारी गावातील शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको अंदोलन

  कोपरगाव प्रतिनिधी  युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवे कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातून जातो. सध्या या भागात...

 कोपरगाव प्रतिनिधी

 युती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवे कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातून जातो. सध्या या भागात रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. परंतु या टप्यातील ठेकेदारांनी , समृद्धीचे व्यवस्थापनाने शासनाचे दिलेले  सर्व नियम जणू ढाब्यावर ठेवले की काय अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू असून या बेशिस्त व्यवस्थापनाच्या विरोधात व शासनाच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी भोजडे व वारी गावातील शेतकऱ्यांनी समृध्दीचे सर्व गाड्या अडवून रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. 

याप्रसंगी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करतांना माजी सभापती मच्छिंद्र टेके म्हणाले की, नागपुर ते मुंबई पर्यंतचा हा समृध्दी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहेत. यासाठी हजोरा एकर शेतजमिनीचे संपादन झाले. महामार्गाचे कामकाज सुरु असतांना प्रशासनाने घालुन दिलेल्यानियमाला समृद्धी चालकांनी केराची टोपली दाखवली. या मार्गासाठी वापरण्यात आलेले आलेले गाड्यांना आरटीओ ची परवानगी नाही.अनेक गाड्यांना नंबर प्लेट नाही किंवा दिशा दर्शक चिन्ह देखील नाही. सर्व गाड्या आतिशय खराब अवस्थेत असलेल्या गाड्यांचा वापर केला जात आहे त्याचबरोबर  ग्रामिण भागातील अरुंद व खड्डे असलेल्या रस्त्याचा विचार न करता इतर वाहन चालकांना शेतकऱ्यांना जाणून बुजून नाहक त्रास होईल अशा बेशिस्त पध्दतीने वाहनचालक गाड्या चालवतांना रोज वेगवेगळ्या पध्दतीने अपघात होत आहे.

 शासन व समृद्धी शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा वाट आहेत पाहत आहेत का ?.  सामान्य नागरिकांच्या वाहनांना नंबर प्लेट, आवश्यक ते कागदपत्रे नसेल तर पोलिस प्रशासन आणि आरटीओ अव्वा च्या सव्वा नियमबाह्य दंड वसुली करतात मग समृद्धीच्या कामात यांना वेगळा कायदा आहेत का ? असा सवाल उपस्थितीत करुन टेके पुढे म्हणाले की, जाणारे येणारे अनेक वाहतुकीमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य झाल्याने हरभरा, गहु, ज्वारी, इतर पिकांबरोबर शेतकऱ्यांच्या घराघरात धुळ धुळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रशासनापुढे शेतकरी कितीही ओरडुन ओरडुन न्यायासाठी लढला तर त्याला न्याय मिळणार नसेल तर त्या शेतकऱ्यांनी न्याय मागायचे कोणाकडे ?. या चाललेल्या कामामुळे शेतकऱ्यांचे सर्व जनजीवन विस्कळीत झाले. समृद्धीच्या कामासाठी माती पाहिजे असेल तर ओढेनाले मधील माती घ्या यामुळे जलसंवर्धन चे काम होईल, पाण्याचा साठा वाढेल,पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अनेकवेळा विविध मागण्या करुन देखील प्रश्न मार्गी न लागता प्रलंबित ठेवले जातात. सुपीक जमिनी शेतकऱ्यांला मातीमोल पैसे देवुन जमिनी खरेदी करुन त्या जमिनीचा विनाष करुन टाकल्यामुळे  शेतकऱ्यांना पैसे घेवुन अत्माहत्या करण्याची वेळ समृद्धी चालकांनी आणली आहेत हा चाललेला गोंधळ त्वरीत थांबवा अन्यथा समृद्धी च्या विरोधात मोठे जनअंदोलन उभरण्यात येईल यातून जर काही कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्यास सर्वस्वी प्रशासन व समृद्धी चालक व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा माजी सभापती मच्छिंद्र टेके, फकीर टेके , प्रकाश गोर्डे, गोरख लांडगे, विशाल गोर्डे, ज्ञानेश्वर वेताळ, अनिल गोरे, दत्तू ठोंबरे, नानासाहेब टेके, श्रीनिवास टेके, सुधाकर ठोंबरे, अजय मेहरे, पोपट शिरसाट आदि शेतकऱ्यांनी दिला.

तहसिलदारांची भुमिका योग्य ठरली 

शेतकरी व समृध्दी व्यवस्थापन यांच्या वादातुन झालेल्या रास्तारोको अंदोलन तब्बल पाच तास सुरु होते सदर प्रकरणाची माहिती तहसिलदार योगेश चंद्रे यांना मिळताच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन प्रलंबित प्रश्न व समस्या समजुन घेतल्यांनतर शेतकऱ्यांच्या भक्कम पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अंदोलन मागे घेतले. 


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत