नायलॉन मांजा वापरास व विक्रीला निर्बंध आणावे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नायलॉन मांजा वापरास व विक्रीला निर्बंध आणावे

कोपरगाव प्रतिनिधी काही दिवसावर आलेल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दरवर्षी परंपरेप्रमाणे पतंगोत्सव साजरा केला जातो. हा पतंगोत्सव साजरा करता...

कोपरगाव प्रतिनिधी

काही दिवसावर आलेल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दरवर्षी परंपरेप्रमाणे पतंगोत्सव साजरा केला जातो. हा पतंगोत्सव साजरा करतांना सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर होत असल्यामुळे अनेक अपघात होत असतात. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा वापरास व विक्रीला निर्बंध आणावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजली काळे यांनी केली आहे. 

त्यांनी असे म्हटले आहे कि, काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात भारती जाधव या महिलेचा दुचाकीवरुन घरी जात असतांना नायलॉन मांजामुळे गळा चिरुन जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही याची शास्वती नाही त्यामुळे नायलॉन मांजाच्या वापरास निर्बंध आणणे अत्यंत गरजेचे आहे. पतंग उडविण्याच्या उत्साहापोटी वापरण्यात येणाऱ्या या चायना मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराध पक्षी  देखील या नायलॉन मांजामुळे बळी पडत असतात. राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वीच चायनीज मांजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.


 तरी देखील बाजारात मकरसंक्रांतीच्या सणाच्या आसपास मांजाची विक्री पुन्हा सर्रासपणे सुरु होत असल्यामुळे नागरिक आपल्या हौसेपोटी चायना मांजा खरेदी करतात व या मांजामुळे असंख्य पक्षी मांजात अडकून जायबंदी होतात व त्यांचा जीव देखील जातो तसेच पादचारी आणि दुचाकीस्वारांना मांजाने गळा चिरुन गंभीर दुखापती झाल्याचे घटना यापूर्वी घडल्याअसून त्यातून वादाचे प्रसंग देखील निर्माण झाले आहेत. 

त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी व त्यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी अबाधित राहावे पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा वापरास व विक्रीला निर्बंध आणावे अशी मागणी करून नागरिकांनी देखील नायलॉन मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघाताची जाणीव ठेवून चायना मांजाचा वापर करू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजली काळे यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत