वळण ग्रामपंचायत निवडणूक ११ जागांकरीता २२ उमेदवार रिंगणात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळण ग्रामपंचायत निवडणूक ११ जागांकरीता २२ उमेदवार रिंगणात

वळण/ गोविंद फुणगे          राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक...

वळण/ गोविंद फुणगे 

        राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी ११ जागांकरीता एकुन २२ उमेदवारांनी निवडणुक रनगंनात दंड थोपाटले आहेत.आज उमेद्वारी अर्ज माघारीची शेवटची मुदत असल्याने एकुन ७ उमेद्वारांनी आपले उमेद्वारी अर्ज मागे घेतल्याने आता एकास एक उमेद्वार निवडनुक रिंगणात असल्याने हि निवडणूक रंगतदार होणार असल्याची जोरदार चर्चा झडत आहे.आज अरज माघारी तसेच उमेद्वारांना चिन्हांच वाटप करण्यात आले आहे. निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून दिपक अकोलकर यांनी काम पाहिले तर भाऊसाहेब राशिनकर यांनी सहाय्य केले.

प्रभाग क्र १ ;

एकनाथ ज्ञानदेव खुळे विरूद्ध  धनंजय विक्रमराव आढाव, शोभा रोहिदास आढाव विरूद्ध मुक्ताबाई रामदास खुळे,विमल रोहिदास रंधे विरुद्ध लहानुबाई दिगंबर जाधव


प्रभाग क्र.२ 

संजय भानुदास शेळके विरूद्ध कारभारी सखाराम खुळे,अशोक रामदास कुलट विरूद्ध  रमेश पर्वतराव खुळे ,संजिवणी लक्ष्मण खिलारी विरुद्ध ललिता बांपुसाहेब आढाव

प्रभाग क्र.3

आशाबाई दत्ताञय खुळे विरूद्ध सुजाता रमेश खुळे, सुरेश जालिंदर मकासरे विरुद्ध मनोज भालचंद्र मकासरे 


प्रभाग क्र.४

लिलाबाई सिताराम गोसावी विरूद्ध ज्योती विजय बनकर,सुभाष रामदास ठाकर विरुद्ध काशिनाथ सुरेश गोलवड,पुजा परसराम फुणगे विरुद्ध वर्षा शंकर बर्डे

वळण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक लागल्यापासून हि निवडणूक जनसेवा मंडळाचे दत्ताञय खुळे, ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, बाळासाहेब खुळे यांनी जनसेवा मंडळाकडून निवडुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.परंतु यामधे जनसेवेला मानणा-या काही उमेद्वारांना उमेद्वारी न मिळाल्याने त्यांनी सवता सुभा उभा करण्याचे ठरवले तोच परीवर्तन मंडळाचे कारभारी खुळे, विजय मकासरे, रमेश खुळे यांनी ऐन वेळी उमेद्वारांची शोधाशोध करत नाराजासह तरूण,जेष्ठ असा मेळ घालत जनसेवाला तुल्यबळ लढत देण्यासाठी दंड थोपाडले आहे.आता जनसेवा समोर परिवर्तन अशी सरळसरळ लढत होणार असुन जनसेवा गड राखणार की परिवर्तन मुसंडी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत