वळण(गोविंद फुणगे) वळण येथील संवेदनशील मतदान केंद्रावर केवळ दोन पोलिस कर्मचारी आणि चार होमगार्ड यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवत शांततेत मतदान ...
वळण(गोविंद फुणगे)
वळण येथील संवेदनशील मतदान केंद्रावर केवळ दोन पोलिस कर्मचारी आणि चार होमगार्ड यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवत शांततेत मतदान प्रक्रिया घडवून आणली आहे.
यावेळी तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तसेच पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या वळण मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. आयुब शेख,पो.ह. रवींद्र डावकर, यांच्यासह अक्षय तनपुरे, योगेश निकम, जाधव अवताडे, वैभव नागवडे या चार होमगार्ड यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवत हे मतदान प्रक्रिया शांततेत घडवून आणले आहे.या ठिकाणी पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाढे,पोलिस उपनिरीक्षक निरज बेकील यांनी भेटी देत नागरीकांना शांततेचे आवाहन केले होते.
त्यामुळे हि मतदान प्रक्रिया दिवसभर शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांवर केवळ दोन पोलिस कर्मचारी आणि चार होमगार्ड यांनी ही मतदान प्रक्रिया शांततेत घडून आणल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पोलिस कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत