कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील आयुर्वेदाचार्य डाँ.रामदासजी आव्हाड यांची सातव्यादा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून निवड झाल्याबद्दल ...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील आयुर्वेदाचार्य डाँ.रामदासजी आव्हाड यांची सातव्यादा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदिपराव वर्पे यांनी सन्मान केला.
या प्रसंगी डाॅ.जगदीश झंवर, शंकरराव आव्हाड आदि मान्यवर उपस्थित होते. दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठा तर्फे सातव्यदा आयुर्वेद गुरु या पदावर डाॅ.रामदास आव्हाड यांची निवड झाली आहे.डाँ रामदासजी आव्हाड आयुर्वेदाव्दारे अनेक वर्षा पासुन रूग्णाची सेवा करत आहे.
१९८८ साली त्यांनी आयुर्वेद सेवा सुरु केली.आज पर्यत त्यांना या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २५ पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय,राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहे.
ग्रामीण भागात राहून सलग सातव्यांदा या पदावर नियुक्ती झाली आहे.हि कोपरगावकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे संदीपराव वर्पे म्हणाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत