कोपरगाव(वेबटीम ) कोपरगाव शहरातील कापड बाजार भागात मोकाट जनावरांनी उच्छाद घालत असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. पुष्पांजली शॉपी जवळ गुरु...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरातील कापड बाजार भागात मोकाट जनावरांनी उच्छाद घालत असल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.
पुष्पांजली शॉपी जवळ गुरुवार दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन मोकाट फिरणाऱ्या बैलांनी एकमेकांना मारत उच्छाद मांडला होता.
या भांडणात दोन्ही बैल एकमेकांना आपल्या शिंगावर उचलत फेकत होते यात अमृतकर यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या भागात लहान मूल नेहमी खेळत असतात नागरिकांची नेहमी वर्दळ सुरू असते. मात्र देवकृपेने या भांडणात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.या बैलांच्या उच्चादामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले होते.
याआधी देखील अशाच एका मोकाट फिरणाऱ्या गाईने शहरात ठिकठिकाणी उच्छाद मांडला होता. त्या गाईला पकडण्यासाठी नागरिकांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून मोठ्या शर्तींने या गाईला पकडण्यात यश आले मात्र अशा घटना वारंवार घडू नये यासाठी या मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा पालिकेने बंदोबस्त करून या जनावरांच्या मालकांना नोटीस देऊन याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत