राहूरी फॅक्टरी(वेबटीम) थांब थोडी गाडी बाजूला घे, गांजा घेउन चालला आहेस का? मला तुझी झडती घ्यायची आहे? असे म्हणत पोलीस असल्याचे भासवून...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
थांब थोडी गाडी बाजूला घे, गांजा घेउन चालला आहेस का? मला तुझी झडती घ्यायची आहे? असे म्हणत पोलीस असल्याचे भासवून राहुरी फॅक्टरी येथील व्यापाऱ्याचे ४ तोळे सोने लंपास केल्याची घटना दुपारी २ वाजता कराळेवाडी शांती चौक परिसरात घडली.राहुरी तालुक्यात लुटमारीच्या दिवसेंदिवस घटना वाढत चालल्या आहे.
राहुरी येथील किराणा मालाचे व्यापारी रमेश ताथेड हे आपल्या बसस्टँड येथील किराणा दुकानातून गोणीमध्ये काही साहित्य घेऊन शांती चौकातील दुसऱ्या दुकानात जात होते. दरम्यान एका स्पीड ब्रेकर जवळ पल्सर गाडी घेऊन एक भामटा त्यांना आडवा झाला व मी पोलिस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवू लागला तुमच्या गोणीत गांजा असल्याची माहिती मला मिळाली असून मला तुमची झडती घ्यावयाची आहे असा दम भरला,आपला डाव यशस्वी व्हावा यासाठी त्या ठिकाणी त्या भामट्याचा एक साथीदार येऊन थांबला भामट्यांच्या आदेशावरून तोही स्वतःचे खिसे उघडून त्याला दाखवू लागला हे चालू असताना त्याने ताथेड यांना अगोदर तिथे गोणी रिकामी करायला सांगितले नंतर गळ्यातली सोन्याची चेन व अंगठी गोणीत टाकण्यास सांगितले.
दरम्यान काही कळण्याच्या आत भांबावलेल्या ताथेड यांच्याकडून त्या भामट्याने गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी घेऊन पोबारा केला.
याबाबतची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस लुटमारीच्या घटना वाढत चालल्या आहेत.पोलिस प्रशासन तपास करण्यात अपयशी ठरले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत