विखे-तनपुरे-ढोकणे यांच्या हस्ते खुळे यांच्याकडून रथाचे लोकार्पण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखे-तनपुरे-ढोकणे यांच्या हस्ते खुळे यांच्याकडून रथाचे लोकार्पण

 वळण/गोविंद फुणगे       महंत योगिराज गंगागिरी महाराज यांनी काही काळ या परिसरामध्ये वास्तव्य केले आहे बेटाव्यतिरिक्त महाराज अनेक भागात भ्रमंत...

 वळण/गोविंद फुणगे 

     महंत योगिराज गंगागिरी महाराज यांनी काही काळ या परिसरामध्ये वास्तव्य केले आहे बेटाव्यतिरिक्त महाराज अनेक भागात भ्रमंती करत असत म्हणून काही भाग त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे.तसेच या येथील ग्रामस्थांनी देखील गंगागिरी महाराज यांचं मंदिर  बांधलेले असून नित्यनेमाने गेल्या अनेक वर्षापासून पायी दिंडी सोहळा देखील येथील ग्रामस्थ काढत असल्याचे गौरवोद्गार श्री.श्रेञ सरला बेटाचे मठातीपति ह.भ.प.रामगिरी महाराज यांनी काढले.ते वळण (ता.राहुरी)येथे बोलत होते. 

        येथे श्री.योगिराज गंगागिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त ञिदिनी सप्ताहाची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली.श्री.क्षेञ सरला बेट चे मठातीपति ह.भ.प.रामगिरी महाराज यांच्या काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी तरूनांनी गावातुन मोटारसायकल रॅली काढत भजनी-मंडळासह सवाद्य मिरवणुक काढली प्रसंगी कै. नारायण आणि कै. सत्यभामा खुळे यांच्या स्मरणार्थ बाजार समितीचे संचालक दत्ताञय खुळे यांच्याकडून श्री गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा करता ह.भ.प.रामगिरी महाराज, पुणे सिनेट सदस्या उषाताई तनपुरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांच्या हस्ते आकर्षक रथाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी महाराज यांनी बोलताना सांगितले की, आयोध्या मध्ये होत असलेल्या भव्य राम मंदिर बाबद सर्व नागरिकांनी घराघरातून लोकवर्गणी देणे हे आपलं परमभाग्य असल्याने भरभरून देणगी देण्याचे आवाहन देखील त्यांनी केल आहे. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सांगितले की महिलांमध्ये प्रचंड ताकद असते प्रत्येक कार्यात महिलांनी आता समोर येणे गरजेचे आहे तसेच परमार्थिक श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा देखील नसावी तसेच विखे घराने हे गेल्या चार पिढ्यांपासून पारमार्थिक असल्याने या गोष्टीला  आमचा सकारात्मक प्रतिसाद असतो असं गौरवोद्गार विखे यांनी काढले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत