राहूरी फॅक्टरी येथून तरुणीच्या अपहरणाचा डाव फसला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथून तरुणीच्या अपहरणाचा डाव फसला

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथून १२ वीच्या विद्यार्थीनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना मुलीने निडर होत चालू रिक्षातून उडी घे...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी फॅक्टरी येथून १२ वीच्या विद्यार्थीनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न होत असताना मुलीने निडर होत चालू रिक्षातून उडी घेतली. रिक्षातून मुलीला पाहून पाच तरूणांनी पुढे येत मुलीला धीर दिला. मुलीचे अपहरण होत असल्याचे समजताच त्या तरूणांनी रिक्षाचा पाठलाग करीत महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी फॅक्टरी येथे असलेल्या छत्रपती महाविद्यालय येथे इयत्ता 12 वीच्या शिक्षणासाठी शहरातून एक तरूणी दैनंदिन बस गाडीने ये जा करते. परंतु काल महाविद्यालयात प्रॅक्टीकल असल्याने तिला राहुरीकडे येण्यास उशिर झाला. यामुळे तिने बसऐवजी रस्त्याने जाणार्‍या रिक्षाला हात केला. राहुरी फॅक्टरी येथून रिक्षा निघाली असता रिक्षामध्ये महिलेस चार पुरूष प्रवासी होते. त्यापैकी दोघे जण जोगेश्‍वरी आखाडा परिसरात उतरले. त्यानंतर मागे बसलेली महिला त्या मुलीजवळ येऊन बसली. तिने त्या तरूणीच्या गळ्याजवळ हात नेत तु मध्ये कोठेही उतरू नको. आम्ही म्हणतो तेथे चल. अन्यथा गळा दाबून तुला मारून टाकू असे सांगत त्या तरूणीला घाबरविण्याचा प्रयत्न केला. तरूणीने आपल्यावर संकट आल्याचे लक्षात घेत राहुरी येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय परिसरात असलेली गर्दी पाहून तेथे रिक्षातून खाली उडी घेत स्वतःची सुटका करून घेतली. तरूणी रिक्षातून खाली पडल्याचे पाहून तेथे सुजित पटारे, संकेत तनपुरे, आकाश गुलदगड, विकी शिंदे, सुनिल लावरे यांनी तात्काळ धाव घेतली. तरूणीला धीर देत रिक्षातून उडी घेण्याचे कारण विचारले. तरूणीने सगळी कैफियत सांगताच त्या तरूणांनी रिक्षाचा पाठलाग केला. सदरच्या रिक्षा चालकाने पळ काढला. परंतु त्यामध्ये असलेली महिला राहुरीत दिसून आली. तरूणांनी त्या महिलेला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली होती. पकडलेल्या त्या महिलेकडून पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे दिले जात होते. याबाबत पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी सांगितले की, पोलिसांकडून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. महिलेसह त्या रिक्षा चालकाची सविस्तर माहिती घेतली जाईल. पकडलेल्या महिलेची गुन्हेगारी पार्श्‍वभुमी तपासणी करणार आहोत. या घटनेबाबत सविस्तर तपासणी करून गुन्हा दाखल केला जाईल असे 
पो.नि. गाडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत