देवळाली प्रवरा (वेबटीम) छत्रपती प्रतिष्ठान, उंबरे यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श पोलीस पाटील हा पुरस्कार उंबरे गावचे पोलीस पाटील गोरक्ष...
देवळाली प्रवरा (वेबटीम)
छत्रपती प्रतिष्ठान, उंबरे यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श पोलीस पाटील हा पुरस्कार उंबरे गावचे पोलीस पाटील गोरक्षनाथ मोहन देव्हारे यांना महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराचे वितरण केले जाते .यावर्षीचा आदर्श पोलीस पाटील पुरस्काराचे मानकरी गोरक्षनाथ मोहन देव्हारे हे ठरले . कोरोना कालावधीमध्ये उल्लेखनीय काम देव्हारे यांनी केले प्रशासकीय कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे देव्हारे यांचा भला माणुस म्हणून नावलौकिक आहे पोलीस पाटील ही जबाबदारी सांभाळताना गावातील कायदा व सुव्यवस्था उत्कृष्ट रहावी याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असतो.लॉक डाउन काळात उंबरे ग्रामस्थांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ते सतत प्रयत्नशील व जागरूक राहिले .त्यांच्या या कार्याची दखल घेत छत्रपती प्रतिष्ठानने देव्हारे आदर्श पोलिस पाटील हा सन्मान बहाल केला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत