कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरात कोपरगाव नगर पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाई केल्या जात असून या कारवाइ करताना एकावेळी १० ते १२ नग...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरात कोपरगाव नगर पालिकेने प्लास्टिक वापरावर जप्तीच्या कारवाई केल्या जात असून या कारवाइ करताना एकावेळी १० ते १२ नगर पालिकेचे कर्मचारी दुकानात घुसून त्यांनी अरेरावीची व दमदाटीची भाषा करून असभ्य वर्तन केले. ज्या व्यापाऱ्यांचे दुकानात ५० मायक्रोच्या पुढच्या पिशव्या आहेत त्या जप्त केल्या. त्यामुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांचा रक्तदाब वाढुन शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापाऱ्यांचे दुकानात या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दंडाच्या पावत्या फेकत, अरेरावीची भाषा करत निघून गेले. व्यापाऱ्यांनी नम्रतापूर्वक व सभ्यपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु हे कर्मचारी ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केली याचे आम्ही सर्व व्यापारी समर्थन करतो. परंतु व्यापारी ५० मायक्रोच्या पुढे पिशव्या वापरात असतानासुद्धा त्यांचेवर अरेरावीची व दमदाटी केल्याचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे वतीने निषेध नोंदविण्यात येत आहे असे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
व्यापारी ५० मायक्रोच्या पुढील पिशव्या वापरतील परंतु भाजीपाला, फळे विक्रेते, चहा विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांना ५० मायक्रोच्या पिशव्या वापरणे परवडणारे नाही. या बाबतीत शासनाने देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच कोपरगाव नगरपालिकेने देखील हा पर्याय उपलब्ध करण्यास पुढाकार घेतल्यास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यात सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.
कोपरगाव शहरात व्यापारी महासंघ वतीने सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविणे, कोपरगाव शहरातला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तलावातील गाळ काढणे, कोरोनाचे काळात अन्नदान योजना राबविणे यांसारख्या अनेक सामाजिक योजनांत नेहमीच पुढाकार घेत असतो. कोपरगाव शहरात खराब रस्ते, प्रचंड धुळीचा त्रास सहन करत व्यापारी वर्ग आपले दुकान चालवत आहे. अर्थांत आम्ही कायद्याचे पालन करणार आहोत. कोरोना काळात प्रचंड मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आता कुठे पुन्हा स्थिर स्थावर होत असताना होत असेलेली धडक कारवाई हि व्यापाऱ्यांना जाचक होत आहे. तसेच व्यापारी वर्गानेही ५० मायक्रो पेक्षा खाली कॅरी बॅगा वापरू नये असे हि आवाहन व्यापारी महासंघाचे वतीने कर
ण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत