विकासकांमाच्या बाबत मी भेदभाव करत नाही- आ.लहु कानडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विकासकांमाच्या बाबत मी भेदभाव करत नाही- आ.लहु कानडे

  वळण(प्रतिनिधी)         विकासकामांबाबत तालुक्या-तालुक्यातील भेदभाव करणारा मी आमदार नाही त्यामुळे श्रीरामपूर तालुक्‍याच्या विकासाबरोबरच राहु...

 वळण(प्रतिनिधी)

        विकासकामांबाबत तालुक्या-तालुक्यातील भेदभाव करणारा मी आमदार नाही त्यामुळे श्रीरामपूर तालुक्‍याच्या विकासाबरोबरच राहुरी तालुक्यातील ३२ गावातील देखील विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे प्रतिपादन श्रीरामपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहु कानडे यांनी केले आहे.ते मुसळवाडी (ता.राहुरी)येथे बोलत होते.


       मुसळवाडी येथे म्हसोबा महाराज व एकादशरुद्र भगवान यांचा निर्मला माता सहज योग कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी टाकळीमिया मुसळवाडी या कमानीचे भूमिपूजन आणि नामकरण आमदार लहू कानडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कानडे बोलत होते की,या भागातील अनेक रस्त्यांची कामे मी मार्गी लावलेली असुन मुसळवाडी बंधाऱ्याच्या कामासह  म्हसोबा परिसरामध्ये तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुशोभीकरण करण्यात येणार आहे. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने निवडून देऊन आमदार केले त्यामुळे येथील लोकांचे काम करणं हे माझं प्रथम कर्तव्य समजतो सर्वप्रथम जेथे कामाची अधिक दुर्दशा झालेली आहे तेथील विकास कामांना महत्त्व देऊन तेथील विकास कामे हे आधी केले मी अधिकारी असताना दुनियादारी बघितली म्हणून कोणत्या कामाचं कसं नियोजन करायला हवं हे मला चांगलं समजतं.

कोरोनाच्या काळामध्ये आपला संपर्क होऊ शकला नाही परंतु यापुढे आता अधिक-अधिक संपर्कात राहून जनतेची कामे करणार असल्याचे देखील आमदार लहू कानडे यांनी  सांगितले आहे. यावेळी शेतक-यांच्या शेतीचे वीजबिले माफ करावीत अन्यथा येणा-या काळात स्वाभिमानी आंदोलन करेल अशी भुमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आमदार  कानडेंचे लक्ष वेधले असता कानडे यांनी उत्तर देताना सांगितले की, आम्ही देखील शेतकऱ्यांची मुले आहोत हे सरकार शेतकऱ्यांच्या आहे. वीज बिलातील ६३ टक्के खर्च हा तेथील पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे त्यामुळे आपण देखील शेतीची बिलबिले भरणे बाबत आपले कर्तव्य समजून भरावीत आणि शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कानडे यांनी केलं यावेळी राहुरी येथील पप्पू कलापुरे यांनी काँग्रेस पक्षात आमदार कानडे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे.

     या प्रसंगी मुसळवाडी येथील सरपंच अमृत धुमाळ, पंचायत समिती सदस्य सुरेश निमसे, रवींद्र आढाव,ज्ञानेश्वर मुरकुटे ,टाकळीमिया येथील सरपंच केशव शिंदे, किशोर बनकर, आदींसह ग्रामस्थ आणि सहयोगी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत