वळणमधे सरपंच पदासाठी अनुसूचित स्री राखीव उमेद्वार नसल्याने सरपंच निवड प्रक्रिया पेच ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वळणमधे सरपंच पदासाठी अनुसूचित स्री राखीव उमेद्वार नसल्याने सरपंच निवड प्रक्रिया पेच !

  वळण /गोविंद फुणगे             राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीसाठी आज सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली असुन वळण मधे सरपंच पदाची आरक्षणा...

 वळण /गोविंद फुणगे 

           राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीसाठी आज सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली असुन वळण मधे सरपंच पदाची आरक्षणाची सोडत हि अनुसूचित


जाती" स्री" राखीवसाठी निघाले आहे.माञ निवडणूकीत अनुसूचित जाती स्री राखीव मतदार संघातातुन उमेद्वारी लढविढ्यासाठी आरक्षण नसल्याने या ठिकाणी पुरुषाने निवडणूक लढवली होती.त्यामुळे "सरपंच" पदाची निवडण हि कायदेशीर बाबीत अडकली असल्याने मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. माञ कायदेशीर बाबींची पुर्तता करून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने  याठिकाणी "स्री" च्या ऐवजी व्यक्तीचे आरक्षण देखील कले जाऊ शकते अशी माहीती तहसीलदार यांनी दिली आहे

    राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायतमधे जनसेवा मंडळाच्या दहा जागा आल्या आहेत तर परिवर्तन मंडळाला एक जागा जागा मिळाली आहे.निवडणूकीत सर्वच आरक्षणाच्या राखीव जागा ह्या जनसेवेने काबीज केल्या आहेत. आज सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली असुन वळण मधे अनुसूचित जाती स्री राखीवसाठी सरपंच पदाचा आरक्षण निघाले आहे.माञ याठिकाणी अनुसूचित जाती स्री राखीव मधुन निवडणूकच झाली नसल्याने सरपंच निवडीचा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.याबाबत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, येणा-या सरपंच-उपसरपंच निवडणूक कार्यक्रम हा ठरलेल्या दिवशी पुर्ण होणार असुन सरपंच पदाच्या आरक्षणासह उपसरपंच पदासाठी सदर ग्रामपंचायतीतुन अर्ज मागविले जाणार आहेत जेथे सरपंच पदाचे आरक्षित उमेद्वार नाहीत तेथुन सरपंच पदाचा अर्ज न आल्यास केवळ उपसरपंच यांचीच निवड या दिवशी होणार आहे.तर सरपंच पदाचा आरक्षित अर्ज न आल्याने सदर प्रोसडिंग हि माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असुन सरपंच निवडीच्या आरक्षणावर जिल्हा अधिकारी हे अंतिम निर्णय घेतील आणि पुढील काळात सरपंच आरक्षण जाहीर करून करून ती निवड जाहीर करतील त्यामुळे आता वळण मधे येणा-या निवडीत फक्त उपसरपंचाचीच निवड होणार असुन सरपंचांच्या निवडीसाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत