उंबरेतील दुर्योधन आणि दुष्यंसनाचे राज्य हटवा : कारभारी ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेतील दुर्योधन आणि दुष्यंसनाचे राज्य हटवा : कारभारी ढोकणे

 उंबरे : वेबटीम        गावात विकासकामे करण्याऐवजी काहींनी सरपंच पदाचे लिलाव चालू केले आहेत, आशा या दुर्योधन आणि दृश्यासनाचे गावातील राज्य आ...

 उंबरे : वेबटीम   


    गावात विकासकामे करण्याऐवजी काहींनी सरपंच पदाचे लिलाव चालू केले आहेत, आशा या दुर्योधन आणि दृश्यासनाचे गावातील राज्य आता उखडून टाका, असे आवाहन माजी  चेअरमन कारभारी पाटील ढोकणे यांनीं केले.   
 

कारभारी ढोकणे म्हणाले, या निवडणुकीत आपल्याला गावात वातावरण खूप चांगले आहे, प्रत्येक वॉर्डात चांगले उमेदवार आहेत, सुशिक्षित व साक्षर लोक आमचेकडे आहेत, त्यामुळे एकदा आमच्या ताब्यात सत्ता द्या, प्रभाग 1 मध्ये बापूसाहेब दुशिंग आणि विजया नानासाहेब ढोकणे, प्रभाग 2 मध्ये कैलास अडसुरे, सुनीता वाघ, विजय साबळे, प्रभाग 3 मध्ये कैलास खंडागळे, भानुदास गायकवाड, सुवर्णा पंडित, प्रभाग चार गणेश गोरक्षनाथ ढोकणे, अशाबाई गोरक पटारे, सीमा दारकुंडे, प्रभाग पाच बाबासाहेब ढोकणे, नीता ढोकणे, सोनाली शेजुळ हे योग्य व गरीब उमेदवार दिले आहेत.  उमेदवार दिले आहेत, मूळ ओबीसींच्या जागेवर सोनाली शेजुळ यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधी मंडळाने येथे ओबीसींची जागा स्वतः हिरावून घेतली आहे, हा येथिल कासार, कुंभार, सुतार, नाभिक आदी समाजावर अन्याय आहे, त्यामुळे आता या बाराबलुतेदार लोकांनी एकत्र येऊन आपल्यावरील आक्रमण रोखावे, या निवडणुकीत प्रभाग पाचमध्ये व संपूर्ण गावात एक वेगळीच लाट तयार झाली आहे, ही लाट गुप्त आहे, कुणी काही बोलत नाही पण 15 तारखेला गावात या लाटेचे रूपांतर त्सुनामीत होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत