वळण/गोविंद फुणगे पाच वर्षात सत्ताधा-यांनी किती आश्वासन पुर्ण केलीत त्याचा हिशोब द्यावा.ग्रामसभेला अनण्यसाधारण महत्व असते परंतु पाच वर्षात य...
वळण/गोविंद फुणगे
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वळण ग्रामपंचायत निवडुकीची रनधुमाळी सुरू झाली असुन परिवर्तन आणि जनसेवा अशी तुल्यबळ लढत होत आहे.गुरूवारी परिवर्तन मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष ठुबे(गुरूजी) हे होते.तर व्यासपीठावर गोरक्षनाथ खुळे, पर्वत खुळे, आसिफ शेख,भाऊसाहेब आढाव, भाऊसाहेब खिलारी, विठ्ठल आढाव, जगन्नाथ खुळे,पिनु कार्ले आदि होते.तर विजय मकासरे, धनंजय आढाव, कारभारी खुळे, रमेश खुळे, विजय आढाव, मनोज मकासरे, विजय बनकर, काशिनाथ गोलवड आदि उमेद्वारांनी मनोगत व्यक्त केले.
बाबा खुळे पुढे म्हणाले की,आमच्या पाच वर्षातील कामे पहा अन् आता सत्ताधा-यांची पाच वर्षात कामे पहा आम्ही जनतेसाठी पाणी योजनेसह रस्त्यांची कामे केली पण काम करत असताना अनेकांशी वाईटपणा आला आमच्या काळातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील खासदार दिलीप गांधी यांच्या स्थानिक विकास निधीतुन पाण्याची टाकी , हनुमान मंदिर तसेच गंगागीरी महाराज मंदिर तसेच मस्जीद मस्जिद प्राणंगणात तत्कालिन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्थानिक विकास निधीतुन सिमेंट ब्लाॅक बसवाणे आदि विकासकांमाचे प्रस्ताव पाठवले होते तेच कामे या पाच वर्षात झाली असुन या व्यतिरिक्त कोणती भरीव विकास कामे यांनी केलीत हे आता जनतेला सांगवे ,आमच्या काळात पाणी पुरवठा विभागातील फीक्स डिपाॅझीट पावती म्हणून चार लाख पन्नास हजार रूपये होते ती पावती देखील यांनी सत्तेचा गैरउपयोग करून मोडल्या आजही ग्रामपंचायत एकुन थकबाकी हि अंदाजे २५ लाख रूपये असुन येणा-या काळात पाणी बंद होण्याची देशील शक्यता नाकारता येत नाही यातुनच सत्ताधा-यांची निष्यक्रियता समोर येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायत कारभार हा एकसुञी अससे आवश्यक आहे.आमचे बहुतांशी उमेद्वार हे तरूण आणि उच्चशिक्षित आहेत.
त्यामुळे मतदारांनी योग्य निर्णय घेऊन परिवर्तन करावे असे आवाहन खुळे यांनी केले आहे. प्रसंगी डाॅ.विजय मकासरे म्हणाले की,इतक्या मोठ्या गावात लघुशंका करण्यासाठी साधी एक मुतारी देखील बांधण्यात आली नाही तर हनुमान मंदिराशेजारी मोठी दुर्गंधी पसरली आहे. गावात वेगवेगळ्या योजना राबबुन विकास साधण्यासाठी तरूणांना संधी द्या तर युवा उमेद्वार धनंजय आढाव म्हणाले की,सत्ताधा-यांना सत्ता हि आपल्याआवती भोवती पाहीजे होती,म्हणून यांनी सुरक्षित तरूणांना डावलले आहे पण आता जनता जनार्दन असुन योग्य तो उमेद्वार निवडून देतील व त्यांना आपली जागा दाखवतील.
*ऐनवेळी सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ!*
गावातील प्रभाग क्रमांक चार मधे गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळामधुन दुषित पाणी पुरवठा होत असल्याने हे पाणी घेऊन संतापलेल्या महिलांनी गाव गाठले अन् परिवर्तन मंडळाच्या उमेद्वारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या संतापलेल्या महिलांच्या व्यथेचा व्हिडिओ युवा कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्याने गावात चांगलेच वातावरण तापले होते.आता या दुषित पाणी पुरवठा बाबाद ग्रामसेवकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागल आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत