उंबरे : वेबटीम गावात विकास करण्याऐवजी काही लोकांनी गाव भकास केले आहे, त्यात आता हुकूमशाही सुरू झाली आहे, गोरगरिबांना दम देऊन अर्ज मागे घेण...
उंबरे : वेबटीम
गावात विकास करण्याऐवजी काही लोकांनी गाव भकास केले आहे, त्यात आता हुकूमशाही सुरू झाली आहे, गोरगरिबांना दम देऊन अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, गावातील जनतेच्या मनात या अन्यायाविरोधात सुप्त लाट निर्माण झाली असून विरोधकांनी कितीही पैशांचे वाटप केले तरी स्वाभिमानी मतदार आमिषाला बळी पडणार नाही. सारिका ढोकणे या बिनविरोध निवडून आल्याने हे आपल्यासाठी शुभसंकेत आहेत. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीत जनता इतिहास घडवणार आहे, आपले सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होतील व प्रभाग पाचमधील सोनालीताई शेजुळ ह्या सर्वात जास्त मतांनी निवडून येतील, असा विश्वास गणराज शेतकरी मंडळाचे प्रमुख साहेबराव दुशिंग यांनी व्यक्त केलेउंबरे येथील गणराज शेतकरी मंडळाचा प्रचार नारळ शुभारंभ आज महादेव मंदिरात पार पडला. यावेळी मंडळाचे जेष्ठ नेते गंगाधर दादा ढोकणे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचार शुभारंभ झाला. यावेळी माजी चेअरमन कारभारी ढोकणे, इंजि गोरक्षनाथ दुशिंग, प्रा रामकीसन ढोकणे, संदीप दुशिंग, विलासराव ढोकणे, अशोक ढोकणे, लक्ष्मण पटारे आदी मोजके कार्यक्रत्ये हजर होते.
यावेळी साहेबराव दुशिंग म्हणाले, गावात नवीन कोणती योजना नाही, कोणती भरीव कामे नाहीत, उलट दादागिरी केली जात आहे. खोटे नाटे आरोप केले जात आहेत, मात्र जनता आता फसणार नाही. यावेळी बदल निश्चित आहे. त्यासाठी जनतेने एकत्र येऊन या ऐतिहासिक निवडणुकीत आपले मत गणराज शेतकरी मंडळाच्या गोरगरीब उमेदवारांना देऊन या क्रांतीचे साक्षीदार व्हावे, असे हात जोडून आवाहनही केले. यावेळी अनिल ढोकणे यांनी सूत्रसंचालन करत अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले,कोरोना पर्शवभूमीवर अगदी 25 लोकात हा कार्यक्रम पार पाडला। यावेळी गणराज मंडळाचे खाते उघडलेल्या तथा बिनविरोध निवडुन आलेल्या प्रा सारिका रामकीसन ढोकणे यांचा सन्मान करण्यात आला,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत