उंबरे ग्रामपंचायतीच्या अर्ज माघारीच्या दिवशी दोन गटात शाब्दीक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे ग्रामपंचायतीच्या अर्ज माघारीच्या दिवशी दोन गटात शाब्दीक

राहूरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक ४ डिसेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत अ...

राहूरी(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिनांक ४ डिसेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने उंबरे ग्रामपंचायतीच्या टेबल समोर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी एका गटाकडून दबाव टाकल्याने काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होत. याठिकाणी एक कार्यकर्त्यांनी सदर उमेदवारी अर्ज मुदत संपल्यानंतरही घेऊ अशी विनती निवडणुक अधिकारांना करताच त्या ठिकाणी पोलिसांनी येवुन त्या तरुणास ताब्यात घेतले.

उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  आप्पासाहेब दुशिंग ,कारभारी ढोकणे यांच्या पॅनलचे नागरींकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी महिला उमेदवार सोनाली गोरक्षनाथ शेजुळ या उमेदवाराला तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी अर्ज माघारीसाठी दबाव टाकल्याचा आरोप उपस्थित आप्पासाहेब  दुसिंग,कारभारी ढोकणे यांनी केला.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत गर्दी हटवली तर एका कार्यकत्यास ताब्यात घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत