आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीपैकी प्रवरा नदी काठावरील आंबी, अंमळनेर, केसापुर, दवणगाव, संक्रापूर...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीपैकी प्रवरा नदी काठावरील आंबी, अंमळनेर, केसापुर, दवणगाव, संक्रापूर या ग्रामपंचायतीच्या दोन पॅनल मध्ये सरळ चुरशीच्या लढती पार पडल्या.
आंबी ग्रामपंचायतीमध्ये ९ जागेसाठी तीन वार्डातून १८ उमेदवार एकमेकाच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे होते. येथे १२८३ मतदारापैकी ११०२ स्री-पुरुष मतदारांनी मताधिकार हक्क बजावून ९० टक्के मतदान केले.
अंमळनेर मध्ये ७ जागेसाठी निवडणूक होऊन चार जागा बिनविरोध होऊन ३ जागेसाठी दोन गटात अटीतटीची व प्रतिष्ठेची निवडणूक पार पडली .
केसापूर ग्रामपंचायतीमध्ये ९ जागेसाठी दोन पॅनल व अपक्ष उमेदवारांमध्ये अटीतटीची निवडणूक होऊन वार्ड नंबर एक मधून सुनिता दादासाहेब मेहेत्रे या अगोदरच बिनविरोध निवडणूक आल्या होत्या. तेथे विक्रमी ९२ टक्के मतदान पोलीस बंदोबस्तात शांततेने पार पडले. येथील सर्वात वयोवृद्ध मतदार चाँदबी जैनुद्दीन शेख या १०५ वर्षाच्या वृद्ध महिलेने आपल्या मतदानाचा हक्क बजावत तरुणाईपुढे एक नवा आदर्श ठेवला. एरवी मतदानाची सुट्टी मजेत घालवण्यात अनेक सुशिक्षित लोकांचा कल असतो. मतदानाला दुय्यम महत्त्व देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यापासून ही पिढी दुरावताना दिसत आहे. असे असताना केसापूर येथील चाँदबी जैनुद्दीन शेख या आज्जीनी पुढील पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा मी मतदानाचा हक्क बजावणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.
उमेदवाराचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असले तरी, मतदार राजा कुणाच्या गळ्यात विजयी माळ घालणार हे आता सोमवारी मतमोजणी झाल्यानंतरच समजणार आहे. त्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले असणार हे मात्र तितकेच खरे!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत