रेव्हेन्यु काॅलनीने कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रेव्हेन्यु काॅलनीने कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही

कोपरगाव प्रतिनिधी  कोपरगांव शहरातील रेव्हेन्यु हौसिंग सोसयटी काॅलनी सव्र्हे नंब र 213/3 ले आउट मंजुर झालेला असुन रेव्हेन्यु हौसिंग सोसायटीने...

कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगांव शहरातील रेव्हेन्यु हौसिंग सोसयटी काॅलनी सव्र्हे नंब र 213/3 ले आउट मंजुर झालेला असुन रेव्हेन्यु हौसिंग सोसायटीने अतिक्रमण केलेले असल्याची चर्चा होत आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सोसायटीने केलेले नाही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन सोसायटीचे चेअरमन तुकारात मुर्तडक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे की, सव्र्हे नंबर 213/3 मध्ये 29 सप्टेंबर 1973 मध्ये ले आऊट मंजुर झालेला आहे. सव्र्हे नंबर 214 च्या धारकांनीच ले आउटमधील रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. शहर निवास आराखडयात सव्र्हे नंबर 213/3 व 213/4 मधुन कोणताही रस्ता नाही व अॅप्रोच रस्ता नाही. सासोयटीच्या स्थापनेपासुन चारही बाजुन कंपाउंट आहे व रेव्हेन्यु हौसिंग सोसायटीतील अंतर्गत रोड हे सोसायटीच्या सभासदांकरिता प्लाॅटमध्ये जाणे येणेसाठी वापरासाठी असल्याने यावर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच राहत नाही. नगरपालिकेने त्या रहिवासी यांना पर्यायी रस्ता दिला आहे. त्यावरील अतिक्रमणबाबत नगरपालिकेचा विषय आहे. 

त्यासंदर्भात रेव्हेन्यु काॅलनीचा कुठलाही संबंध नाही. कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव वापरुन शहरातील जनतेची, सोसायटीच्या सभासदांची दिशाभूल करण्याचा जो कोणी प्रयत्न करीत असेल त्यांनी करु नये, नागरिकांनी देखील सोसायटीच्या अतिक्रमण बाबत अफवांवर विश्वास ठेवु नये असा आवाहन देखील रेव्हेन्यु हौसींग सोसायटीचे चेअरमन तुकाराम मुर्तडक यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत