कोपरगाव(वेबटीम) मी मर्चंट बँकेच्या कारभाराबद्दल तुरुंगवास भोगला हे खरे आहे. कारण तुमच्या सारखे प्रतिष्ठित कर्जबुडवे कर्जदार मला लाभले. बॅ...
कोपरगाव(वेबटीम)
मी मर्चंट बँकेच्या कारभाराबद्दल तुरुंगवास भोगला हे खरे आहे. कारण तुमच्या सारखे प्रतिष्ठित कर्जबुडवे कर्जदार मला लाभले. बॅंकेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला कर्ज दिले हाच आमचा गुन्हा झाला, तो मला मान्य आहे. त्याबद्दल मला तुरुंगवास झालाच पाहिजे होता तसा तो मला झाला. सुमारे 20 वर्षांपूर्वी बँकेने तुम्हाला जे कर्ज दिले त्याचे साधारण आज अखेर अंदाजे कर्ज बाकी रक्कम २०-२२ लाख झाले असावे. या कार्जबकिचा रकमेबाबत आपण जनतेची व पत्रकारांची दिशाभूल करत आहात. त्या क़र्जा पोटी तुम्ही ५० हजार रक्कम मागील महिन्यातच भरली. या बद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. याच पद्धतीने आपण कर्ज भरीत राहिलात तर पुढील ५० वर्षात कर्ज भरले जाऊ शकते याची मला खात्री व विश्वास आहे. नगराध्यक्षपद मिळाल्यानंतरच तुम्ही कर्ज भरता हे आमच्या लक्षात आल्यामुळे बँकेचे कर्ज पूर्णपणे भरून घेण्यासाठी तुम्हाला साधारण इथून पुढे ५० वर्षे तरी नगराध्यक्षपदी ठेवावे असे आम्ही कोपरगावच्या जनतेला कळकळीचे आवाहन करतो असे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी म्हंटले आहे.
सातभाई यांनी पुढे म्हंटले की, आपण ज्या पद्धतीने मर्चंट बँकेबद्दल व संचालकांबद्दल टिका करित असायचे त्यावरून कोपरगाव शहरातील जनतेचा असा गैरसमज होता की आपण मर्चंट बॅंकेचे खूप मोठे ठेवीदार आहात, आपले खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आपण चिडून बँकेबद्दल बोलता. परंतु आपण तर बँकेचे कर्ज बुडवे कर्जदार निघालात. हे कर्ज भरावे लागू नये म्हणून आपण पंधरा ते सोळा वर्ष वाट बघितली पण जेव्हा आपल्याला लक्षात आले की कर्ज भरल्या शिवाय पर्याय नाही म्हणून आपण पन्नास हजार रुपयापासून कर्ज भरण्यास सुरुवात केली हे सुद्धा जनतेच्या लक्षात आले आहे.
आपण येवला रोड येथिल आरक्षणाच्या विषयाबद्दल बोलताना नेहमी वेगवेगळी व खोटी माहिती देत आहात आपण जनतेला माहिती देताना हे आरक्षण सन १९८५, सन १९८७, सन २००२, सन २०१० याच काळात रद्द करण्याचे ठराव झाले असे अपण पत्रकारांना सांगत आहात. जर त्या काळात हे आरक्षण रद्द झाले असते तर सन २०१२ च्या को.न.पा. च्या विकास आराखड्यात या आरक्षणांचा समावेश कसा झाला असता?
एक खोटे लपविण्यासाठी आपण किती वेळेस खोटे बोलणार? आपण आरक्षणाच्या विषयाबद्दल बोलताना गिरमे यांचे नाव घेता या आरक्षणाच्या विषयावर आमचे असे स्पष्ट मत आहे की आरक्षण कोणत्या व्यक्तींचे आहे यापेक्षा ते आरक्षण खेळाच्या मैदानाचे व पोलीस परेड ग्राउंडचे आहे. शहराच्या दृष्टीने हे दोन्ही आरक्षणे महत्वाचे आहे म्हणून आमचा हे आरक्षण रद्द करण्यास विरोध आहे. आपण फक्त उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका ठरावाप्रमाणे दाखल करावी ही विनंती.
तुमचे घराणे हे महाराष्ट्रात नावाजलेले घराणे आहे. भाजप पक्षात मोठे मोठे राजकीय पदे भूषवलेली घराणे आहे. एवढा मोठा राजकीय वारसा तुम्हाला असूनही तुमच्या कपाळकरंटेपणामुळे तुमची भाजप पक्षातून राजकीय हाकलपट्टी का झाली याचे तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज होती परंतु असे आत्मपरीक्षण तुम्ही कधीच करणार नाही, त्यात आपल्याला कमीपणा वाटतो हे कोपरगावकरांना माहिती आहे.
सौ .स्नेहलता कोल्हे ताईंचा पराभव हा निसटता पराभव आहे. मात्र तुमचा पराभव हा डिपॅाझिट जप्त होऊन झालेला दारुण पराभव आहे हे तुम्ही कधीच विसरू नका. या सर्व प्रकारातून एक चांगली गोष्ट झाली सौ स्नेहलता ताई कोल्हे यांना आपण कायम शेलकी विशेषणे लावायचे त्याऐवजी आपण आता सौ कोल्हे ताई म्हणायला लागला या निमित्ताने आपण स्त्रीत्वाचा सन्मान करायला लागला याबद्दल कोपरगाव शहरातील जनता आपली आभारी आहे.
नेहमीप्रमाणे आपण याही वार्तापत्रात रस्ता टेंडर मधील भ्रष्टाचाराच्या मुख्य मुद्द्याला का बगल देत आहात? आपणास त्याचा खुलासा करणे अवघड झाले आहे असे दिसते म्हणून आपण महत्त्वाच्या नसलेल्या मुद्द्यांची चर्चा करून वेळ मारून नेत आहात का? असा प्रश्न संजय सातभाई यांनी उपस्थित केला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत