अहमदनगर(वेबटीम) अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार साहेब यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आज दुपारी १२.३० वाजता...
अहमदनगर(वेबटीम)
अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार साहेब यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आज दुपारी १२.३० वाजता नगरच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विविध वृत्तपत्रांतून काम करताना त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडले. स्वत:चे वृत्तपत्रही चालविले. सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठीही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत